Border 2 OTT: थिएटरमध्ये गाजत असलेला 'बॉर्डर २' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे बघता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:54 IST2026-02-04T13:53:08+5:302026-02-04T13:54:53+5:30

थिएटरमध्ये 'बॉर्डर २' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असतानाच, आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Border 2 OTT released date netflix sunny deol varun dhawan diljit dosanjh | Border 2 OTT: थिएटरमध्ये गाजत असलेला 'बॉर्डर २' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे बघता येईल?

Border 2 OTT: थिएटरमध्ये गाजत असलेला 'बॉर्डर २' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे बघता येईल?

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि वरुण धवन यांचा युद्धपट 'बॉर्डर २' सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगलं यश मिळवत आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचं मन जिंकलं असून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असतानाच, आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

'बॉर्डर २' चे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी केले आहेत. हा चित्रपट २० मार्च २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी तो ओटीटीवर आणला जातो, त्याच नियमानुसार मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येईल. जरी निर्मात्यांनी अद्याप तारखेची अधिकृत घोषणा केली नसली तरी प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट ओटीटीवर पाहण्याची उत्सुकता आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत बोलायचे झाले तर, 'बॉर्डर २' हा २०२६ मधील बॉलिवूडचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांत २७५ कोटी रुपयांचे आपले बजेट वसूल केले असून, जागतिक स्तरावर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. १९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा हा सीक्वल असून यामध्ये १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील थरार, विशेषतः बसंतरची लढाई अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

अनुराग सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सनी देओल लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेर यांच्या भूमिकेत परतला आहे. त्याच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या दमदार भूमिका आहेत. चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल विश्वात किती विक्रम मोडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title : 'बॉर्डर 2' ओटीटी पर: कब और कहाँ देखें?

Web Summary : सनी देओल और वरुण धवन की 'बॉर्डर 2' लगभग 20 मार्च, 2026 को नेटफ्लिक्स पर स्ट्रीम हो सकती है। फिल्म ने विश्व स्तर पर ₹300 करोड़ से अधिक की कमाई की है, जो 'बॉर्डर' की विरासत को जारी रखती है।

Web Title : 'Border 2' OTT Release: When and Where to Watch?

Web Summary : Blockbuster 'Border 2,' starring Sunny Deol and Varun Dhawan, may stream on Netflix around March 20, 2026. The film has grossed over ₹300 crore worldwide, continuing the 'Border' legacy with a gripping war narrative.