'बिग बॉस'फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला किस करत दिली प्रेमाची कबुली; 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:43 IST2021-10-07T16:42:51+5:302021-10-07T16:43:24+5:30

Bigg boss ott:बिग बॉस ओटीटीमध्ये विशेष चर्चेत राहिलेला एक स्पर्धक त्याच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

zeeshan khan announced his relationship with reyhna pandit shared liplock photo | 'बिग बॉस'फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला किस करत दिली प्रेमाची कबुली; 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीला करतोय डेट

'बिग बॉस'फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडला किस करत दिली प्रेमाची कबुली; 10 वर्ष मोठ्या अभिनेत्रीला करतोय डेट

ठळक मुद्देबिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि अभिनेता झीशान खान सध्या त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस ओटीटीचं (bigg boss ott) पहिलं पर्व संपलं. मात्र, अजूनही या शोची आणि त्यातील स्पर्धकांची चर्चा थांबलेली नाही. बिग बॉस ओटीटीच्या घरातून बाहेर पडलेले अनेक स्पर्धक सध्या सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. यामध्येच सध्या एका अभिनेता त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये (bigg boss ott) विशेष चर्चेत राहिलेला एक स्पर्धक त्याच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. याविषयी त्याने स्वत: खुलासा केला आहे. 

बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि अभिनेता झीशान खान  (zeeshan khan) सध्या त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आला आहे.  'कुमकुम भाग्य' मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या झीशानला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली. त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच झीशानने चाहत्यांसोबत त्याच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या प्रेयसीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याचं रिलेशनशीप जाहीर केलं आहे.

झीशानने अलिकडेच अभिनेत्री रेहाना पंडितसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रेहाना त्याची प्रेयसी असल्याचं त्याने जाहीर केलं आहे.  रेहाना झीशानप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री असून तीदेखील कुमकुम भाग्य मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.

एकेकाळी सलमानसोबत तुलना होणारा 'हा' स्पर्धक बिग बॉसमध्ये घेतोय सर्वात कमी मानधन

 “माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीपासून ते माझ्या आयुष्यातील प्रेमापर्यंत, माझ्या आनंदापासून माझ्या मन:शांतीपर्यंत. मी जे काही मागितलं होतं ते तूच आहेस. माझा प्रत्येक सेकंद मी तुझ्यासोबत घालवतो, माझा प्रत्येक श्वास तुझ्याच सोबत घेतो. ती व्यक्ती म्हणजे माझं हृदय प्रेमाने भरणारी तू आहेस. असं वर्णन फक्त परीकथेत पाहायला मिळतं. मी अशी लोक पाहिली आहेत ज्यांना वाटतंय असं प्रेम खरं असू शकत नाही. पण नसलेल्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नसतो. मला आशा आहे आणि अशा प्रकारचं प्रेम सगळ्य़ांना मिळावं. तू माझी आहेस आणि मी संपूर्ण जगाला आणि सगळ्य़ांना सांगत आहे की तू माझीच आहेस,” अशा आशयाचं कॅप्शन झीशानने पोस्ट शेअर करत दिलं आहे.

दरम्यान, रेहाना ही झीशानपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं आहे. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत झीशानने त्याच्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे.
 

Web Title: zeeshan khan announced his relationship with reyhna pandit shared liplock photo