एकच हीट तर बॅक टू बॅक १३ फ्लॉप, तरीदेखील 'या' अभिनेत्याची रणबीर अन् प्रभासपेक्षा जास्त कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:13 IST2024-12-29T10:04:17+5:302024-12-29T10:13:50+5:30
आपल्या कारकिर्दीत फक्त एकच हीट आणि बॅक टू बॅक १३ फ्लॉप चित्रपट देऊनही तो कमाईच्या बाबतीत अनेक हिट स्टार्सला टक्कर देतो.

एकच हीट तर बॅक टू बॅक १३ फ्लॉप, तरीदेखील 'या' अभिनेत्याची रणबीर अन् प्रभासपेक्षा जास्त कमाई
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे एकापेक्षा एक हीट सिनेमे देत आहेत. दुसरीकडे असेही कलाकार आहेत, जे एका मागोमाग एक फ्लॉप सिनेमे देत आहे. यात एका बॉलिवूड अभिनेत्याचा समावेश होतो. पण, मनोरंजन जगतापासून दूर राहिल्यानंतरही तो कमाईच्या बाबतीत अनेक हिट स्टार्सला टक्कर देऊ शकतो. या अभिनेत्यानं 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं हूं ना' या चित्रपटात किंग खान शाहरुखच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती.
तो अभिनेता आहे जायेद खान (Zayed khan). फ्लॉप सिनेमे देऊनदेखील हा अभिनेता कोटींची कमाई करतो. जायेद खान हा अभिनेता चित्रपट निर्माते संजय खान यांचा मुलगा आणि फिरोज खान यांचा पुतण्या आहे. जायेद खान हा शेवटचा 'शराफ़त गई तेल लेने' या सिनेमात पाहायला मिळाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर जायेद खानने स्वतःला व्यवसायाकडे वळवलं.
अभिनेत्याने स्टार्टअप्स आणि अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली. ET च्या अहवालानुसार, सध्या त्यांची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपये आहे. अर्थातच त्याची कमाई ही चित्रपटांमध्ये सक्रियपणे काम करणारे कलाकार अभिनेता अल्लू अर्जून, रणबीर कपूर आणि प्रभास यांच्यापेक्षाही खूप जास्त आहेत. जायेद खानने फिल्म इंडस्ट्रीपासून दूर एक बिझनेसमन म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं 2005 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण मलायका पारेखसोबत लग्न केलं होतं. त्यांना झिदान आणि अरिझ ही दोन मुले आहेत.