"नाक लांब आहे, सर्जरी करून घे...", विद्या बालनला २० वर्षांपूर्वी दिग्दर्शकाकडून मिळालेला हा सल्ला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 09:32 IST2025-07-31T09:31:51+5:302025-07-31T09:32:45+5:30
Vidya Balan: विद्या बालनचा पहिला चित्रपट 'परिणीता' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अभिनेत्री खूप उत्सुक आहे.

"नाक लांब आहे, सर्जरी करून घे...", विद्या बालनला २० वर्षांपूर्वी दिग्दर्शकाकडून मिळालेला हा सल्ला, पण...
३० वर्षांपूर्वी 'हम पाच' या कॉमेडी लोकप्रिय मालिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विद्या बालन(Vidya Balan)ने २००५ मध्ये 'परिणीता' (Parineeta Movie) या क्लासिक रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी याआधी ती २००३ मध्ये 'भालो थेको' या बंगाली चित्रपटात दिसली होती, परंतु 'परिणीता'मुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त आणि सैफ अली खान दिसले होते.
'परिणीता' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट होता, ज्याने त्याच्या बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली होती. अलिकडेच या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. हा चित्रपट 8K मध्ये मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होत आहे, ज्याबद्दल चाहते देखील खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. त्याचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते आणि निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली होती.
विद्याला नाकाची सर्जरी करण्याचा मिळालेला सल्ला
या चित्रपटात तिच्या दमदार अभिनयाने विद्या बालनने सर्वांचे मन जिंकले. अलिकडेच एका मुलाखतीत तिने सांगितले की, निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी तिला चित्रपटासाठी नाकाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. तिने सांगितले, ''त्यांनी मला सांगितले, 'तुझे नाक लांब आहे, ते नीट कर.' पण मी नकार दिला. मी कधीही माझ्या चेहऱ्यावर कोणतेही बदल केले नाहीत, मी फक्त फेशियल करते. मी जशी आहे तशी स्वतःवर विश्वास ठेवते.''
सुरुवातीला मिळाला संमिश्र प्रतिसाद
विद्या म्हणाली की '''परिणीता'च्या यशानंतर अनेक मोठे दिग्दर्शक तिला भेटू लागले. पण फोटोशूटमध्ये लोक म्हणायचे, 'चल काहीतरी नवीन करून पाहूया', जे तिला चकित करायचे. ती विचार करायची की जेव्हा तू मला अजून नीट पाहिलेही नाही, तेव्हा तू कोणती नवीन गोष्ट करून पाहशील? लोक तिला तरुण आणि ग्लॅमरस दिसण्याबद्दल बोलत असत, जे काही काळानंतर तिला त्रास देऊ लागले.''
चित्रपटाची कथा आणि पात्र
चित्रपटाची कथा १९६० च्या दशकातील कोलकात्यात घडते. विद्या ललिता नावाच्या एका अनाथ मुलीची भूमिका साकारते जी तिच्या मामाच्या घरी वाढते. तिचा बालपणीचा मित्र शेखर (सैफ अली खान) सोबतचे तिचे नाते खूपच गुंतागुंतीचे आहे. हा चित्रपट प्रेम, सामाजिक भेदभाव आणि स्वाभिमान यासारख्या विषयांना स्पर्श करतो. विद्या बालनने ललिताच्या भूमिका खूप छान साकारली आहे. सैफ अली खानसोबतची तिची केमिस्ट्री देखील खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी होती.