"आम्हाला मारायचंय का?", नात नव्यानं बनवलेलं जेवण खाऊन जया बच्चन यांना कोसळलं रडू, वाचा हा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:03 IST2024-03-22T14:03:11+5:302024-03-22T14:03:27+5:30
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड चर्चेत आहे, ज्यामध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यासोबत नव्याने बच्चन कुटुंबातील खाद्यपदार्थांचे सीक्रेट सांगितले.

"आम्हाला मारायचंय का?", नात नव्यानं बनवलेलं जेवण खाऊन जया बच्चन यांना कोसळलं रडू, वाचा हा किस्सा
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिच्या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड चर्चेत आहे, ज्यामध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यासोबत नव्याने बच्चन कुटुंबातील खाद्यपदार्थांचे रहस्य सांगितले. कुटुंबातील काही पदार्थांना कुटुंबातील सदस्यांची नावे देण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, नव्या नवेलीने सांगितले की तिला मसालेदार जेवण आवडते आणि यामुळे तिने एकदा आजी जया बच्चन आणि भाऊ अगस्त्य नंदा यांना रडवले.
नव्या नवेली नंदाने आजीला त्या घटनेची आठवण करून दिली आणि मग काय घडले ते सांगितले. नव्या म्हणाली, 'एक दिवस मला वाटले की दोघांसाठी (जया बच्चन आणि अगस्त्य नंदा) पास्ता बनवेन आणि त्यांनी होकार दिला. म्हणून मी जाऊन ते लसूण आणि मिरची घालून बनवले. मी इतके तिखट घातले की जेवताना ते रडू लागले. नव्याने पुढे सांगितले, 'ते म्हणत होते, तुला आम्हाला मारायचं आहे का? या पास्त्यात खूप मिरची आहे.'
दरम्यान, श्वेता नंदा म्हणाली की, अर्थातच सुरुवातीपासून घरी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. पण एक गोष्ट नेहमी ठरलेली होती की राजमा भात आठवड्यातून एकदाच बनतो. नव्या नवेली नंदाने सांगितले की, घरातील व्यक्ती जी डिश बनवण्यात निष्णात आहे त्या पदार्थाला त्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच बच्चन कुटुंबातील पदार्थांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे देण्यात आली आहेत. जसे अभिषेक बच्चन चांगली मटन करी बनवतो तेव्हा त्याचे नाव अभिषेकची मटण करी असे आह आणि जर श्वेता नंदा पास्ता बनवते, तर त्याचे नाव श्वेताचा पास्ता आहे.
नव्या म्हणाली, 'प्रत्येक घराची एक खासियत असते आणि मला एक गोष्ट माहित आहे की लोकांना आमच्या घरी खायला आवडते - बटाट्याची साल. हे खरं तर खूप गोंडस आहे कारण आम्ही काही पदार्थांची नावे लोकांच्या नावावर ठेवली आहेत. आमच्याकडे 'नानी माँ की खिचडी' आहे, जी ती बंगाली शैलीत तयार करते. आमच्याकडे 'मामा टोस्ट' आहे. आजीने शोध लावलेले हे सँडविच आहे. आमच्याकडे 'नव्याचा बटाटा' आहे कारण ती मी तयार केलेली रेसिपी आहे. आमच्याकडे 'श्वेताचा पास्ता'ही आहे. आजोबा नेहमी म्हणतात, 'मी श्वेताचा पास्ता खाईन.'