"पॅण्टमध्ये लघवी करावी लागेल...", दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केली विचित्र मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:27 IST2025-05-17T10:26:48+5:302025-05-17T10:27:43+5:30
बॉलिवूड अभिनेत्रीने अलिकडेच खुलासा केला की, तिला एका सीनसाठी तिच्या पँटमध्ये लघवी करावी लागली. दिग्दर्शकाने स्वतः ही मागणी केली होती. मात्र, हा सीन शूट करता आला नाही.

"पॅण्टमध्ये लघवी करावी लागेल...", दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केली विचित्र मागणी
चित्रपटांमध्ये आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी कलाकार अनेक युक्त्या वापरतात आणि कधीकधी या युक्त्या खूप चांगल्या प्रकारे काम करतात. अलीकडेच 'वश' (Vash Movie) चित्रपटातील अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले की, दिग्दर्शकाने तिला एका सीनसाठी तिला तिच्या पँटमध्ये लघवी करायला सांगितले होते. इतकेच नाही तर अभिनेत्रीने ही मागणी आनंदाने मान्य केली. आता स्वतः अभिनेत्रीने याबाबतचा खुलासा केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'वश' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री जानकी बोडीवाला (Janki Bodiwala) हिने तिच्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
२०२४ मध्ये अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका यांच्यासोबत 'शैतान' या चित्रपटातून जानकी बोडीवालाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. जानकी ही मूळची २०२३च्या गुजराती चित्रपट 'वश'मध्ये दिसली होती. या चित्रपटावर 'शैतान' सिनेमा आधारीत आहे. अलिकडेच, २९ वर्षीय अभिनेत्रीने 'वश'च्या रिहर्सलमधील एक क्षण शेअर केला जिथे चित्रपटाचे दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक यांनी तिला एका महत्त्वाच्या सीनसाठी प्रत्यक्ष लघवी करण्यास सांगितले.
जानकी म्हणाली...
फिल्मफेअरशी बोलताना जानकी म्हणाली, "मी गुजराती आवृत्ती केली होती आणि मला तिथेही तेच दृश्य करावे लागले. जेव्हा आम्ही कार्यशाळा घेत होतो. तेव्हा दिग्दर्शकांनी मला विचारले, तू ते प्रत्यक्ष करू शकाल का? लघवी करण्याचे दृश्य. त्याचा मोठा प्रभाव पडेल आणि मी त्याबद्दल खूप आनंदी होते. जसे, वाह! एक अभिनेत्री असल्याने, मला ते पडद्यावर करण्याची संधी मिळत आहे. असे काहीतरी जे कोणीही कधीही केले नाही."
जानकी पुढे म्हणाली की, कलात्मक कारणांमुळे आणि अनेक रिटेकच्या आव्हानांमुळे दृश्य अशा प्रकारे चित्रीत करता आले नाही. 'सेटवर ते व्यावहारिकदृष्ट्या शक्य झाले नसते. म्हणून आम्हाला ते करण्याचा एक मार्ग सापडला. मला आनंद झाला की मला खऱ्या आयुष्यात मी करू शकत नसलेल्या सर्व गोष्टी करायला मिळाल्या. ते दृश्य अक्षरशः माझं आवडता दृश्य आहे आणि त्या दृश्यामुळे मी त्या चित्रपटासाठी होकार दिला. जानकीने प्रामुख्याने गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०१५ मध्ये आलेल्या गुजराती चित्रपट 'छेलो दिवस'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, जो कृष्णदेव याज्ञिक यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला होता. नंतर तिने 'ओ'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये तारी, तंबुरू, छुट्टी जशे छक्का, तारी मेट वन्स मोअर आणि नदी दोष यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.