Sara Ali Khan : “माझं ब्रेकअप झालं आणि …”, सारा अली खानसाठी २०२० हे वर्ष फारच वाईट होतं...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:22 IST2023-03-05T13:21:54+5:302023-03-05T13:22:51+5:30
Sara Ali Khan : २०२० हे वर्ष सारा अली खानची परीक्षा घेणारं ठरलं. एका ताज्या मुलाखतीत सारा यावर बोलली.

Sara Ali Khan : “माझं ब्रेकअप झालं आणि …”, सारा अली खानसाठी २०२० हे वर्ष फारच वाईट होतं...!!
‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी सारा अली खान (Sara Ali Khan) हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. ‘केदारनाथ’ पाठाेपाठ आलेला तिचा ‘सिम्बा’ हा सिनेमाही गाजला. पण यानंतर लव्ह आज कल आला, तो दणकून आपटला. कुली नंबर १ या सिनेमाही तिची निराशा केली. बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांमुळे सारा दु:खी होती. त्यातच तिच्या वाट्याला ब्रेकअपचं दु:ख आलं. एकंदर काय तर २०२० हे वर्ष तिची परीक्षा घेणारं ठरलं. एका ताज्या मुलाखतीत सारा यावर बोलली.
लव्ह आज कलच्या शूटींगदरम्यान सारा अली खान व कार्तिक आर्यनच्या अफेअरची चर्चा होती. दोघंही यावर काहीही बोलले नव्हते. पण करण जोहरच्या कॉफी विद करण या चॅट शोमध्ये दाेघांची पोलखोल झाली होती. सारा व कार्तिकचं नातं फार काळ टिकलं नाही. २०२० मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं.
‘द रणवीर शो’मध्ये सारा यावर बोलली. ब्रेकअप, फ्लॉप चित्रपटांबद्दल तिने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “२०२० साल हे माझ्यासाठी फारच वाईट होतं. या वर्षाची सुरूवात माझ्या ब्रेकअपपासून झाली आणि हे वर्ष पुढे आणखी वाईट ठरतं गेलं.” २०२० साली साराचे ‘लव्ह आजकल २’, ‘कुली नंबर १’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते मात्र दोन्ही चित्रपट फ्लॉप गेलेत.
इतकी दु:खी होते की...
त्या काळात ट्रोलिंगचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण मी आणखी इतके दु:खी होते की मला माझ्याबद्दल कोण काय बोलतंय, याची पर्वा नव्हती. तुमचं हृदय तुटलेलं असेल, ते दु:खी, थकलेलं, घाबरलेलं असेल तर लोक काय म्हणतात, याने काय फरक पडतो, असं ती म्हणाली.
सारा लवकरच ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. विक्रांत मेस्सीसोबत ‘गॅस लाईट’ या सिनेमातही ती दिसणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.