यशचा 'टॉक्झिक' पुढे ढकलला, 'धुरंधर २'सोबत क्लॅश टळला, पण 'या' अभिनेत्याच्या सिनेमाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:59 IST2026-03-04T16:59:01+5:302026-03-04T16:59:49+5:30

'टॉक्झिक' पुढे ढकलल्यामुळे रणवीर सिंगचा फायदा झाला असला, तरी यशने आता दुसऱ्या एका बॉलिवूड स्टारसाठी अडचण निर्माण केली आहे.

Yash's 'Toxic' postponed clash with 'Dhurandhar 2' avoided but now varun dhawan s film got competition | यशचा 'टॉक्झिक' पुढे ढकलला, 'धुरंधर २'सोबत क्लॅश टळला, पण 'या' अभिनेत्याच्या सिनेमाला धोका

यशचा 'टॉक्झिक' पुढे ढकलला, 'धुरंधर २'सोबत क्लॅश टळला, पण 'या' अभिनेत्याच्या सिनेमाला धोका

रणवीर सिंगचा 'धुरंधर २' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'टॉक्झिक' या चित्रपटांमधील क्लॅश टळला आहे. यशने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली असून, आता हा चित्रपट ४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या निर्णयामुळे १९ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'धुरंधर २' साठी रस्ता मोकळा झाला असून, रणवीरच्या चित्रपटाला आता सोलो रिलीजचा फायदा मिळणार आहे.

'टॉक्झिक' पुढे ढकलल्यामुळे रणवीर सिंगचा फायदा झाला असला, तरी यशने आता दुसऱ्या एका बॉलिवूड स्टारसाठी अडचण निर्माण केली आहे. तो अभिनेता म्हणजे वरुण धवन. वरुणचा आगामी चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. वरुणने सुमारे चार महिन्यांपूर्वीच ही तारीख लॉक केली होती, मात्र आता यशने त्याच्या एक दिवस आधीच आपला बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने बॉक्स ऑफिसवर नवीन संघर्ष पाहायला मिळणार आहे.

यशची फॅन फॉलोइंग प्रचंड असून 'KGF 2' नंतर तो प्रदीर्घ काळाने पडद्यावर परतत आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये 'टॉक्सिक'बद्दल मोठी उत्सुकता आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी असे तगडे कलाकार दिसणार आहेत. अशा मोठ्या चित्रपटासमोर वरुण धवनच्या चित्रपटाला प्रेक्षक मिळवणे कठीण जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे, 'है जवानी तो इश्क होना है' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून याचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. या चित्रपटात वरुणसोबत पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बाजी मारतो आणि बॉक्स ऑफिसवर कोणाचे वर्चस्व राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title : यश की 'टॉक्सिक' 'धुरंधर 2' से नहीं टकराएगी, वरुण धवन खतरे में।

Web Summary : यश ने 'टॉक्सिक' को टाला, रणवीर की 'धुरंधर 2' को फायदा। अब, 'टॉक्सिक' की रिलीज वरुण धवन की फिल्म से टकराएगी, बॉक्स ऑफिस पर प्रतिस्पर्धा होगी। यश की बड़ी फैन फॉलोइंग धवन के लिए चुनौती है।

Web Title : Yash's 'Toxic' avoids clash with 'Dhurandhar 2', Varun Dhawan at risk.

Web Summary : Yash postponed 'Toxic', benefiting Ranveer's 'Dhurandhar 2'. Now, 'Toxic' release clashes with Varun Dhawan's film, creating box office competition. Yash's huge fan following poses challenge for Dhawan.