आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:42 IST2026-03-11T18:40:35+5:302026-03-11T18:42:56+5:30
'धुरंधर २' या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिनेमात झळकणार असून तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'च्या कथेला नवं वळण मिळणार आहे

आता खरी मजा येणार! 'धुरंधर २'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री कन्फर्म; सिनेमाची रंगत आणखी वाढणार
दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याच्या सिक्वलची म्हणजेच 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री सिनेमात झळकणार असून तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'च्या कथेला नवं वळण मिळणार आहे. ही अभिनेत्री आहे यामी गौतम.
कथेसाठी महत्त्वाचा 'कॅमिओ'
यामी गौतम या चित्रपटात एका विशेष रोलमध्ये दिसणार आहे. जरी तिची भूमिका छोटी असली, तरी ती चित्रपटाच्या कथेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. यामीने या भूमिकेसाठी सुमारे ५ दिवस शूटिंगही पूर्ण केले आहे. तिची ही भूमिका ॲक्शनने परिपूर्ण असून प्रेक्षकांना थक्क करणारी असेल, असे सांगितले जात आहे. सिनेमातील एका महत्वाच्या हॉस्पिटल सीनमध्ये यामी दिसेल. तिच्या एन्ट्रीने 'धुरंधर २'मधील हमजा अली अर्थात रणवीरने साकारलेल्या भूमिकेचा नवा पैलू प्रेक्षकांसमोर येईल.
यामी गौतम आणि तिचा पती आदित्य धर यांनी यापूर्वी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' सारख्या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता 'धुरंधर २' च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या पटकथेबद्दल बोलताना यामीने एका मुलाखतीत सांगितले होते की, आदित्यने लिहिलेली ही कथा इतकी जबरदस्त आहे की, तिला स्वतःला या चित्रपटात मोठी भूमिका करण्याची इच्छा झाली होती. याशिवाय यामीने 'धुरंधर २' पाहिला असून तिला थक्क करणारा अनुभव मिळाला.
चित्रपटाची तगडी स्टारकास्ट
'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंग पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यामी गौतमच्या एन्ट्रीमुळे या चित्रपटाची रंगत अधिकच वाढणार आहे. रणवीर सिंहचा हा हाय-व्होल्टेज ॲक्शन चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.