'धुरंधर' सिनेमावर यामी गौतमची पहिली प्रतिक्रिया, पती आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:28 IST2025-11-19T18:27:39+5:302025-11-19T18:28:15+5:30
यामी म्हणाली,"मला पत्नी म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतो. हा सिनेमा..."

'धुरंधर' सिनेमावर यामी गौतमची पहिली प्रतिक्रिया, पती आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा बहुप्रतिक्षित सिनेमा ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या सिनेमाचं काम सुरु होतं. रणवीर सिंह, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ४ मिनिटांच्या ट्रेलरमधून 'धुरंधर'साठी सर्वांनीच किती मेहनत घेतली याचा अंदाज येतो. आदित्य धरची पत्नी अभिनेत्री यामी गौतमने सिनेमावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'मिर्ची'ला दिलेल्या मुलाखतीत यामी गौतम म्हणाली,"मी जितकं या सिनेमाला जवळून पाहिलं आहे त्यातून मी एक हिंट देते की हा कमाल सिनेमा आहे. एक पत्नी म्हणून मला आदित्यचा खूप अभिमान वाटतो. एक आर्टिस्ट म्हणून त्याने जे काम केलं आहे ते वाखणण्याजोगं आहे. आजकाल आपण म्हणतो की प्रेक्षकांना अजून काय असं नवीन दाखवणार जेणेकरुन त्यांना चित्करपटगृहात खेचून आणता येईल. तर मला वाटतं धुरंधर तो सिनेमा आहे. २०२५ हे वर्ष संपतंय आणि हा सिनेमा २०२६ साठी वेलकम गिफ्ट असणार आहे."
यामी गौतम नुकतीच 'हक' सिनेमात दिसली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. या सिनेमातील अभिनयासाठी यामीला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी मागणीही चाहत्यांनी केली. तर दुसरीकडे यामीचा नवरा आदित्य धरने 'धुरंधर'मधून मोठा धमाका केला आहे. या सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.