बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 14:57 IST2024-02-29T14:57:07+5:302024-02-29T14:57:24+5:30
तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो (Mathias Boe) लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अफेअरला १० वर्षे झाली आहेत. आता तापसीने लग्नाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली...
अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) साऊथ आणि बॉलिवूडमध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या वक्तव्यात असे काही बोलते जे ऐकून सर्वजण अवाक् होतात. तिने पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असेच काहीसे सांगितले आहे. अनेक दिवसांपासून तापसीच्या लग्नाची चर्चा होताना दिसते आहे. ती बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो (Mathias Boe) याच्याशी लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अफेअरला १० वर्षे झाली आहेत. आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. आता तापसीने लग्नाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
तापसी पन्नूने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि कधीच देणारही नाही. नुकतेच एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मथियास बोसोबत लग्न करणार आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की मार्च महिन्यात उदयपूरमध्ये हे जोडपे भव्य लग्न करणार आहेत. या जोडप्याचा विवाह शीख-ख्रिश्चन धर्मानुसार होणार आहे.हा विवाह अत्यंत खाजगी असेल असा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
१० वर्षांपासून करताहेत एकमेकांना डेट
तापसी पन्नू भारतीय बॅडमिंटन संघाच्या प्रशिक्षकाला जवळपास १० वर्षांपासून डेट करत आहे. मात्र, २०२० मध्ये मॅथियासने बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली. तापसी सिनेजगतात खूप सक्रिय आहे. अलीकडेच ती शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटात दिसली होती. मॅथियास आणि तापसीच्या भेटीबद्दल सांगायचे तर ते 'चश्मे बद्दूर' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. याबद्दल बोलताना स्वत: तापसी म्हणाली होती की, तेव्हापासून मी फक्त एका व्यक्तीसोबत आहे आणि माझा त्याला सोडण्याचा किंवा इतर कोणासोबत राहण्याचा कोणताही विचार नाही कारण मी या नात्यात खूप आनंदी आहे.
आगामी प्रोजेक्ट
तापसीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर, तापसी 'वो लड़की है कहाँ' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्शद सय्यद यांनी केले असून यात प्रतीक बब्बर आणि प्रतीक गांधी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यासोबतच ती 'हसीन दिलरुबा'च्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती विक्रांत मॅसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.