कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? सेलिब्रिटी Astrologer ने उलगडलं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:32 IST2025-10-09T18:31:09+5:302025-10-09T18:32:31+5:30
लग्नाच्या तीन वर्षांनी कतरिना गरोदर असून ती ४२व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. एका सेलिब्रिटी ज्योतिषाने याचं गुपित उलगडलं आहे.

कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? सेलिब्रिटी Astrologer ने उलगडलं गुपित
लोकप्रिय सेलिब्रिटी कपल असलेल्या कतरिना कैफ आणि विकी कौशलने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. कतरिना आणि विकी लवकरच आईबाबा होणार आहे. लग्नाच्या तीन वर्षांनी कतरिना गरोदर असून ती ४२व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. एका सेलिब्रिटी ज्योतिषाने याचं गुपित उलगडलं आहे.
सेलिब्रिटी ज्योतिष अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी विकी-कतरिनाला मुलगा होणार की मुलगी? याबाबत भाकित केलं आहे. त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. कतरिना आणि विकीचा लग्नातील फोटो त्यांनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कतरिना आणि विकीला मुलगी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचं पहिलं अपत्य हे मुलगी असेल", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
The first child of Vicky Kaushal and Katrina Kaif will be a daughter. pic.twitter.com/2wjWk7SaKN
— Anirudh Kumar Mishra (Astrologer) (@Anirudh_Astro) October 8, 2025
ज्योतिष अनिरुद्ध मिश्रा यांनी याआधीही अनेक सेलिब्रिटींबाबत भाकित केले होते. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि करीना कपूर यांच्याबद्दल ज्योतिषाने केलेलं भाकित खरं ठरलं होतं. २०२० मध्ये अनुष्का शर्मा आणि करीना यांच्या प्रेग्नंसीबाबत त्यांनी भाकित केलं होतं. २०२१ मध्ये अनुष्काला मुलगी होईल आणि करीनाला दुसराही मुलगाच होईल, असं ते म्हणाले होते.