Koffee With Karan 8 : "सिनेमांत सारा अली खानच्या आईची भूमिका साकारणार का?", करीना कपूर म्हणाली, "मला वाटतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 11:56 IST2023-11-16T11:55:42+5:302023-11-16T11:56:15+5:30
'कॉफी विथ करण'मध्ये बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली होती.

Koffee With Karan 8 : "सिनेमांत सारा अली खानच्या आईची भूमिका साकारणार का?", करीना कपूर म्हणाली, "मला वाटतं..."
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण शोचं नवीन पर्व लोकप्रिय ठरत आहे. नुकतंच कॉफी विथ करणमध्ये बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली होती. आलिया आणि करीनाने या शोमध्ये करण जोहरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत एकमेकींची पोलखोल केली. या शोमध्ये करणने बेबोला सावत्र मुलगी सारा खानबाबत प्रश्न विचारला.
"सिनेमांत सारा अली खानच्या आईची भूमिका साकारणार का?" असा प्रश्न करणने करीनाला विचारला. यावर उत्तर देत ती म्हणाली, "मला वाटतं मी एक अभिनेत्री आहे. मी कोणत्याही वयाची भूमिका साकारू शकते. तर याबाबत तू काहीही म्हणू शकत नाहीस. चांगली भूमिका असेल, तर मी नक्कीच साकारेन." बेबोच्या या उत्तरावर करण म्हणाला, "मग तू यासाठी तयार आहेस?". त्यावर करीनाने "अभिनयाबाबत कुठल्याही गोष्टीसाठी मी तयार आहे," असं उत्तर दिलं.
करीनाने २०१२ साली अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. लग्नाआधी पाच वर्ष ते लिव्ह इनमध्ये राहत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने हा खुलासा केला होता. करीना आणि सैफला तैमुर आणि जेह ही दोन मुले आहेत. करीनाआधी सैफने वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंगबरोबर लग्नगाठ बांधली होती. १३ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी २००४ साली घटस्फोट घेतला. त्यांना सारा आणि इब्राहिम ही मुलं आहेत. सारादेखील बॉलिवूड अभिनेत्री आहे.