'ती माझी चूक झाली'; नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर 'ओ रोमियो'च्या दिग्दर्शकांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:08 IST2026-02-16T10:08:19+5:302026-02-16T10:08:59+5:30
Vishal-bhardwaj: विशाल यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो 4' मध्ये नानांविषयी काही किस्से सांगितले. मात्र, यावेळी त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होतीये.

'ती माझी चूक झाली'; नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर 'ओ रोमियो'च्या दिग्दर्शकांचा खुलासा
'ओमकारा', 'हैदर','कमीने','डेढ इश्किया', '7 खून माफ' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला देणारा प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक म्हणजे विशाल भारद्वाज (Vishal-bhardwaj) . उत्तम सिनेमांमुळे ओळखल्या जाणाऱ्या विशाल यांचा ओ रोमियो हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता नाना पाटेकर (nana patekar) झळकले असून त्यांच्या भूमिकेची सध्या चर्चा होतीये. या चर्चांमध्येच विशाल यांनी नानांविषयी सांगितलेले काही किस्सेही चर्चिले जात आहेत. मात्र, त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होतीये.
अलिकडेच या सिनेमाच्या टीमने 'द ग्रेट इंडियन कपिल शो 4' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी विशाल भारद्वाज यांनी नानांविषयी बरंच भाष्य केलं. अगदी सेटवरील किस्से, त्यांचा अभिनय याविषयी ते भरभरुन बोलले. मात्र, हे बोलत असतांनाच विशाल यांनी एक खंतही व्यक्त केली. नाना पाटेकरांसोबत काम केल्यानंतर विशाल यांना एका गोष्टीचा प्रचंड पश्चाताप होत असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात मान्य केलं.
विशाल भारद्वाज यांना वाटते या गोष्टीची खंत
''ओ रोमियोपूर्वी तुम्ही नाना पाटेकरांसोबत काम का केलं नाही? तुमच्या आधीच्या सिनेमांमध्ये त्यांना का घेतलं नाही? असा प्रश्न कपिलने विशाल यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली. खरं पाहायला गेलं तर ही माझी चूक झाली. कारण, यापूर्वी मी कधीच त्यांना (नाना पाटेकरांना) यासारख्या भूमिका ऑफर केल्या नाहीत'', असं विशाल भारद्वाज म्हणाले.
नाना पाटेकर विशाल भारद्वाजवर नाराज?
विशाल पुढे म्हणाले, "नानांना सगळे लोक प्रचंड घाबरतात. मात्र, ते फार स्वच्छ मनाचे आहेत. मी त्यांच्यासोबत यापूर्वी काम केलं नाही म्हणून खरं तर ते माझ्यावर नाराज होते. ते कधीही भेटले की एकच म्हणायचे, मी नाना पाटेकर आहे. एक कलाकार आहे. आणि, तू मला कधी कास्ट करणार असंही विचारायचे. मला त्यावेळी खरंच फार अवघडल्यासारखं व्हायचं. परंतु, अखेर आम्ही दोघांनी एकत्र काम केलंच."
दरम्यान, 'ओ रोमियो' हा सिनेमा १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. ३० कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, फरीदा जलाल हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.