का बदललं गेलं सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नाव? दिग्दर्शकाने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:25 IST2026-03-17T10:21:35+5:302026-03-17T10:25:44+5:30
सलमानच्या बॅटल ऑफ गलवान सिनेमाचं नाव अचानक का बदललं? दिग्दर्शक म्हणाले-"हा निर्णय..."

का बदललं गेलं सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नाव? दिग्दर्शकाने सांगितलं कारण
Salman Khan Movie: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सलमान हा त्याच्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असतो. तसंच तो त्याच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे देखील अनेकांचं लक्ष वेधून घेत असतो. बॉलिवूडचा भाईजान अशी त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. सध्या सलमान हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्याच्या बॅटल ऑफ गलवान या सिनेमाची इंडस्ट्रीत प्रचंड चर्चा होती. अलिकडेच या चित्रपटाच्या बाबतीत मोठा बदल पाहायला मिळाला. तो म्हणजे चित्रपटाच्या नाव बदलण्यात आलं आहे.
सलमानच्या या आगामी सिनेमाचं नाव आता ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’असं असणार आहे. मात्र, अचानक हा बदल का करण्यात आला. याबद्दल अनेकांना प्रश्न पडला होता. नुकतंच या चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह नवीन शीर्षकाची घोषणा केली. हे नाव बदलण्यामागचं काय कारण होतं. याचा आता खुलासा झाला आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. एचटी सिटी सोबत बोलताना ते म्हणाले, चित्रपटाचे नावात केलेला बदल झालेला नव्हता. सलमानच्या चाहत्यांना कदाचित असा प्रश्न पडेल की हे असं का केलं? पण हा एका रात्रीत घेतलेला निर्णय नव्हता."
मग त्यांनी सांगितलं, "सुरुवातीलाच, आम्ही 'बॅटल ऑफ गलवान' आणि ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ही दोन टायल्स आम्ही रजिस्टर केली होती. हा चित्रपट बनवण्याच्या प्रवासादरम्यान, आम्हाला जाणवलं की हा चित्रपट केवळ एका लढाईबद्दल नाही तर तो मानवता, सहानुभूती देखील दर्शवतो. ही आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि लढाईची कहाणी आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी असंही म्हटलं, चित्रपटात याच नावाचं एक गाणं देखील बनवलं गेलं आहे. जेव्हा ते प्रदर्शित झालं तेव्हा त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं.त्यामुळे त्याच गाण्यावरून चित्रपटाचं शीर्षक ठेवण्याचा निर्णय घेतला. "
हा चित्रपट गलवान वॅलीमधील ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित आहे. ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान एक प्रभावी विचार प्रेक्षकांसमोर मांडत आहे, जो लोकांच्या मनाला भिडत आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट समोर आली नसली तरीही १४ ऑगस्ट २०२६ ला हा चित्रपट रिलीज होईल अशी शक्यता आहे.