एकाही चित्रपटात एकत्र का दिसले नाहीत श्रीदेवी आणि आमिर खान? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:29 IST2025-01-01T13:27:34+5:302025-01-01T13:29:24+5:30
श्रीदेवी आणि आमिर खान यांनी एकही चित्रपट एकत्र का केला नाही? काय होतं कारण...

एकाही चित्रपटात एकत्र का दिसले नाहीत श्रीदेवी आणि आमिर खान? जाणून घ्या कारण...
Aamir Khan - Sridevi : श्रीदेवी यांनी सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . श्रीदेवी या अशा एक अभिनेत्री होत्या, ज्यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या दिलेखचक अदा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांनी आमिताभ बच्चन ते रजनीकांत अशा सुपरस्टारसोबत काम केलं. पण, एक अभिनेता आमिर खान याच्यासोबत त्याचा एकही सिनेमा नाही. आमिर आणि श्रीदेवी यांनी एकत्र चित्रपट न करण्याचे कारण काय? जाणून घेऊया.
आमिर खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. तर श्रीदेवी यांनी तर भारतासह जगभरातील लोकांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. पण, हे दोघे कधीच एकत्र झळकले नाहीत. आमिर आणि श्रीदेवी यांच्यात चांगली मैत्री होती. पण, त्यांचं एकत्र काम न करण्याचं कारण त्यांची दोघांची उंची ठरली होती. एकदा आमिर आणि श्रीदेवी यांचं एकदा एक फोटोशूट झालं होतं. त्यावेळी आमिर खानपेक्षा खूप उंच दिसत असल्यानं श्रीदेवी यांनी हिल्स काढून ठेवल्या होत्या.
श्रीदेवीवर आमिरचा जबरदस्त क्रश होता. खुद्द आमिरने एका जुन्या मुलाखतीत हे मान्य केले होते. पण, दोघांचा एकत्र काम करण्याचा योग कधी जुळून आलाच नाही. अशीदेखील चर्चा आहे की, 'कयामत से कयामत तक' सिनेमानंतर श्रीदेवीसोबतचा एक चित्रपट आमिरला ऑफर झाला होता. पण, ती ऑफर आमिर खान याने नाकारली होती. त्याला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीसोबत काम करणे पसंत नव्हते. प्रेक्षकांना त्याची श्रीदेवीसोबतची जोडी आवडणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं.
दरम्यान, श्रीदेवी आणि आमिर जरी एकत्र झळकले नसले, तरी आता त्यांची मुलं एका सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत. आमिराचा मुलगा जुनैद हा काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'महाराजा' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. तर श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशीने गेल्या वर्षी 'द आर्चीज'मधून पदार्पण केलं. लवकरच खुशी आणि जुनैद हे एका सिनेमात पाहायला मिळणार आहेत.