का झाले श्रद्धा कपूरचे अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 20:12 IST2017-02-05T14:41:29+5:302017-02-05T20:12:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने कमी चित्रपट केले असले तरी देखील आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. तिचा मागील चित्रपट ...

Why did Shraddha Kapoor tears away? | का झाले श्रद्धा कपूरचे अश्रू अनावर!

का झाले श्रद्धा कपूरचे अश्रू अनावर!

लिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने कमी चित्रपट केले असले तरी देखील आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. तिचा मागील चित्रपट ‘ओके जानू’ अपयशी ठरला असला तरी ती पुन्हा एकदा नव्याने कामाला लागली आहे. सध्या श्रद्धा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरवर आधारित ‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असे काही घडले की श्रद्धा अचानक रडायला लागली. 

‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’या चित्रपटात ती हसिना पारक रची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिच्या भावना उमळून आल्या व ती रडायला लागली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा येवढी भावूक झाली की तिचे अश्रू अनावर झाले. ती काही केल्या आपले रडणे थांबवू शकली नाही. यामुळे सेटवर हजर असलेले सर्व लोकांना हेच कळायला मार्ग नव्हता की अखेर श्रद्धाला कसे समजावयाचे? श्रद्धाला समजाविणे कठीण ठरले होते. यामुळे दिग्दर्शक अपूर्व लाखियाने एका तासासाठी शूटिंग थांबवावी लागली. 



या चित्रपटात श्रद्धाचा भावाची भूमिका सिद्धांथ कपूर साकारात आहे. तो दाऊदच्या भूमिकेत दिसेल. सिद्धांथने श्रद्धाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात अखेर सिद्धांथच्या डोळ्यातही अश्रू आले. याबद्दल अपूर्व लाखियाने सांगितले की, श्रद्धा व सिद्धांथ दोघेही भावूक झाले, दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, यामुळे सेटवर असलेल्या सर्वांना आश्चर्य वाटत होते. श्रद्धा व सिद्धांथ यांच्यात असलेले बहीण भावाचे नाते किती दृढ आहे. दोघेही एक मेकांच्या अतिशय जवळ आहे याची कल्पना आली. आम्ही दोघांना काही वेळेसाठी एकटे सोडून दिले. 

‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ या चित्रपटातून श्रद्धाचा भाऊ सिद्धांथ बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. या चित्रपटात त्याने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली असून त्याच्या बहिणीची भूमिका श्रद्धा साकारते आहे. 

Web Title: Why did Shraddha Kapoor tears away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.