सेटवरचा 'तो' सीन अन् १३ वर्षांचा अबोला! रवी किशन-मनोज तिवारींच्या वादाचं खरं कारण आलं समोर, नेमकं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:15 IST2026-03-20T13:13:52+5:302026-03-20T13:15:17+5:30
Ravi kishan: अलिकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात रवि किशन यांनी मनोज तिवारी यांच्यासोबत झालेल्या वादावर भाष्य केलं.

सेटवरचा 'तो' सीन अन् १३ वर्षांचा अबोला! रवी किशन-मनोज तिवारींच्या वादाचं खरं कारण आलं समोर, नेमकं काय घडलेलं?
भोजपुरी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार म्हणजे मनोज तिवारी आणि रविकिशन. दोन्ही कलाकारांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीनही शेअर केली आहे. परंतु, एकेकाळी या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. ज्यामुळे ही जोडी जवळपास १३ वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते.
अलिकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात रवि किशन यांनी मनोज तिवारी यांच्यासोबत झालेल्या वादावर भाष्य केलं. या दोघांमधील वैर आता संपलं जरी असलं तरीसुद्धा त्यांच्या भांडणाचा किस्सा आजही चर्चिला जातो. कपिल शर्मा शोच्या एका भागामध्ये मनोज तिवारी यांनी रविकिशन यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.
नेमका काय आहे रविकिशन-मनोज तिवारी यांच्यातील वाद
एका सिनेमाच्या सेटवर या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. सूत्रांनुसार, एका सिनेमामध्ये फायटिंग सीन होता. ज्यात रविकिशन यांना मनोज तिवारी यांच्या हातून मार खायचा होता. परंतु, रविकिशन यांनी ऑनस्क्रीन मनोज तिवारी यांच्या हातून मार खाण्यास सक्त नकार दिला. आपल्या चाहत्यांना असे सीन आवडणार नाहीत. ते मला हारतांना पाहू शकणार नाहीत, असा विचार करुन त्यांनी या सीनला नकार दिला होता. त्यानंतर अनेक घटनांमध्ये त्यांच्यातील मतभेद वाढू लागले.
दरम्यान, अनेक लहानसहान गोष्टींमध्ये दोघांमध्ये सतत खटके उडू लागले. यामुळे या दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्यातील मतभेद इतके वाढले की याचा परिणाम म्हणजे, ते जवळपास १३ वर्ष एकमेकांशी नीट बोलले नाहीत.