बॉलिवूड गाजवणारे आशिष विद्यार्थी आता सिनेमात काम का करत नाहीत? केला मोठा खुलासा, म्हणाले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:08 IST2025-08-08T15:41:35+5:302025-08-08T16:08:04+5:30
सध्या सिनेमांमध्ये काम का करत नाहीत, याविषयी आशिष विद्यार्थींनी मोठा खुलासा केलाय

बॉलिवूड गाजवणारे आशिष विद्यार्थी आता सिनेमात काम का करत नाहीत? केला मोठा खुलासा, म्हणाले-
अभिनेता आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. आशिष यांनी खलनायक म्हणून आणि कॉमेडी भूमिकांमधून बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. पण सध्या मात्र आशिष विद्यार्थी सिनेमांमध्ये फार कमी दिसत आहेत. अलीकडच्या एका व्लॉगमध्ये त्यांनी ते सध्या सिनेमांमध्ये कमी का दिसत आहेत यामागचं कारण सांगितलं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाले आशिष विद्यार्थी? जाणून घ्या
म्हणून आशिष विद्यार्थी सध्या सिनेमात कमी दिसतात
आशिष विद्यार्थी यांनी एका व्लॉगमध्ये सांगितले की, सध्या ते काम करताना दिसत नाहीत कारण त्यांना फक्त छोटी किंवा साइड भूमिका नको आहेत. ते आता अशा मुख्य भूमिका शोधत आहेत जी भूमिका साकारताना त्यांच्या अभिनयाची खरी ताकद ते दाखवतील. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “जोपर्यंत मला मध्यवर्ती भूमिका मिळत नाही, तोपर्यंत मी थांबेन.”, अशाप्रकारे आशिष विद्यार्थींनी सध्या ते काम का करत नाहीत, याचा खुलासा केलाय.
आशिष विद्यार्थी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार खलनायक आणि गंभीर भूमिका केल्या आहेत. पण आता त्यांना अशा भूमिकेचा शोध आहे जिथे ते प्रेक्षकांवर खोल ठसा उमटवू शकतील. त्यांनी निर्माते आणि कास्टिंग डायरेक्टर्सना थेट संदेश दिला की, “मी अजूनही काम तयार आहे, फक्त मला योग्य संधी द्या.” त्यांनी सांगितले की, ते सध्या वेळ वाया घालवत नाहीत. चित्रपट न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःला थांबू दिले नाही. ते यूट्यूबवर व्लॉग करतात, प्रेरणादायी भाषणं करतात आणि प्रवासाचे अनुभव शेअर करतात. त्यांच्या मते, आयुष्यात संधी मिळण्याची वाट पाहताना देखील सक्रिय राहणे गरजेचे आहे.