असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 12:48 IST2020-07-25T12:18:30+5:302020-07-25T12:48:39+5:30

अमरीश पुरी यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमीर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.

This Is Why Aamir Khan Never Worked With Amrish Puri | असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम?

असं काय झालं होतं की, अमरीश पुरी आणि आमीरने कधीच एका सिनेमात केलं नाही काम?

मोगॅम्बो खूश हुआ....हा डायलॉग ऐकला की लगेच कुणाच्याही डोळ्यांसमोर येतात ते बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांचा. असा खलनायक पुन्हा होणे नाही, असंच त्यांच्याबाबत बोललं जातं. कारण त्यांनी कितीतरी अजरामर भूमिका साकारल्या आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 

अमरीश पुरी यांनी इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षे काम केलं की, जवळपास सर्वाच मोठ्या अभिनेत्याने त्यांच्यासोबत काम केले. ते स्क्रीनवर जरी इतके भयंकर होते, पण खऱ्या आयुष्यात ते फार शांत स्वभावाचे होते. त्यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमीर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.

आमीर खान आणि अमरीश पुरी यांनी 'जबरदस्त' या १९८५ साली आलेल्या सिनेमात काम केलं होतं. पण या सिनेमावेळी असं काही घडलं की, या सिनेमानंतर इतक्या वर्षात दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही. यासाठी काही सिनेमेही आमीरने नाकारल्याचे ऐकायला मिळते.

‘जबरदस्त’ या सिनेमातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाला होता. जबरदस्त सिनेमात अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमीर या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक होता. एक सीन चित्रीत करत असताना अमरीश पुरींचं काहीतरी काम आमीरला आवडलं नाही. याबाबत आमीरने त्यांना जाऊन सांगितलं. पण काही कारणाने दोघांमध्ये वाद झाला. नंतर या दोघांनीही एकमेकांची माफी मागितली. परंतु त्यानंतर हे दोघंही परत कधीच एकत्र दिसले नाहीत.

जबरदस्त या सिनेमाचं दिग्दर्शन आमीरचे काका नासिर हुसेन यांनी केलं होतं. या सिनेमाच्या एका सीनचं शूटींग सुरु असताना आमीर अमरीश यांना काही सूचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमीरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु असं असताना सुद्धा आमीर त्यांना वारंवार सूचना करत होता.

आमीरने लावलेला तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमीरवर संतापले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी आमीरची माफीही मागितली. मात्र त्यानंतर आमीरने त्यांच्यासोबत कधीच काम केलं नाही.

थ्रोबॅक! मिलिंद सोमणने शेअर केला ३१ वर्ष जुना फोटो; सांगितले, पहिल्या प्रोजेक्टसाठी किती मिळाले होते पैसे!

'तुम बिन' मधून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आता करते तरी काय?

Web Title: This Is Why Aamir Khan Never Worked With Amrish Puri