थ्रोबॅक! मिलिंद सोमणने शेअर केला ३१ वर्ष जुना फोटो; सांगितले, पहिल्या प्रोजेक्टसाठी किती मिळाले होते पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:04 PM2020-07-24T12:04:47+5:302020-07-24T12:05:05+5:30

या फोटोची खासियत म्हणजे हा फोटो तो २३ वर्षांचा असतानाचा आहे. त्याने हा फोटो शेअर करून याचाही खुलासा केला की, त्याला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी किती रूपये मिळाले होते.

Super Model Milind Soman recalls time when he was paid rs 50000 for his first project in 1989 | थ्रोबॅक! मिलिंद सोमणने शेअर केला ३१ वर्ष जुना फोटो; सांगितले, पहिल्या प्रोजेक्टसाठी किती मिळाले होते पैसे!

थ्रोबॅक! मिलिंद सोमणने शेअर केला ३१ वर्ष जुना फोटो; सांगितले, पहिल्या प्रोजेक्टसाठी किती मिळाले होते पैसे!

googlenewsNext

मॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर फारच  अॅक्टिव असतो आणि फॅन्ससाठी व्हिडीओ-फोटो शेअर करत असतो. आता मिलिंद सोमणने त्याचा १९८९ मधील फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खासियत म्हणजे हा फोटो तो २३ वर्षांचा असतानाचा आहे. त्याने हा फोटो शेअर करून याचाही खुलासा केला की, त्याला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी किती रूपये मिळाले होते.

इन्स्टाग्रामवर मिलिंद सोमणने गुरूवारी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनला त्याने लिहिले की, '१९८९ मध्ये मला पहिल्या जाहिरातीसाठी काही तासात काही फोटो शूट करण्यासाठी तब्बल ५०००० रूपये ऑफर झाले होते. ही रक्कम ऐकून मी हैराण झालो होतो. मला वाटलं होतं हे लोक पूर्णपणे पागल आहेत. मी त्यावेळी २३ वर्षांचा होतो आणि एका हॉटेलमध्ये काम करत होतो. विचार करत होतो की, मला वेटर किंवा कुक म्हणून करिअरची सुरवात करायला पाहिजे. जग एक अद्भूत जागा आहे'.

काही दिवसांपूर्वीच मिलिंद सोमणने सोशल मीडियात एक फोटो शेअर केला होता. ज्यात तो छाती झाडांच्या पानाने लपवताना दिसला होता. या फोटोवरून मिलिंद चांगलाच ट्रोल झाला होता. त्याची तुलना लोकांना कियारा अडवाणीसोबत केली होती. कारण डबू रत्नानीच्या फोटोशूटमध्ये कियाराने असाच फोटो काढला होता.

दरम्यान मिलिंद सोमण एक सुपर मॉडल राहिलाय आणि अनेक सिनेमातही काम त्याने काम केलंय. मिलिंद त्याच्या एका न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच फेमस झाला होता. तो फिटनेसमुळे चर्चेत असतो. तसेच ५४ वर्षीय मिलिंदने २८ वर्षीय अंकित कुंवरसोबत लग्न केल्यावरही तो चर्चेत आला होता.

हे पण वाचा:

पहिल्याच सिनेमात श्रीदेवीचा हिरो बनला या सुपरस्टारचा मुलगा, पण एका हिटच्या प्रतीक्षेत संपले करिअर!

‘सुशांत का चला जाना ...’ दोन ओळींची सुसाईड नोट लिहून 13 वर्षीय मुलीने केली आत्महत्या 

Web Title: Super Model Milind Soman recalls time when he was paid rs 50000 for his first project in 1989

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.