पार्लरवाली है? ‘अनेक’च्या ट्रेलरमधील ‘ती’ कोण? कतरिना कैफशी आहे खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:11 IST2022-05-05T17:10:36+5:302022-05-05T17:11:07+5:30
Anek Movie Trailer : ‘अनेक’चा ट्रेलर पाहून सगळेच आयुष्यमानचं कौतुक करत आहे. त्याच्याशिवाय या ट्रेलरमधील आणखी एका गोड चेहऱ्याच्या मुलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पार्लरवाली है? ‘अनेक’च्या ट्रेलरमधील ‘ती’ कोण? कतरिना कैफशी आहे खास कनेक्शन
Anek Movie Trailer : आयुष्यमान खुराणाचा (Ayushmann Khurrana) ‘अनेक’ (Anek) नावाचा नवा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात आयुष्मान पहिल्यांदा एका अंडर कव्हर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा नॉर्थ ईस्टच्या राजकीय संघर्षावर आधारित आहे. ‘अनेक’चा ट्रेलर पाहून सगळेच आयुष्यमानचं कौतुक करत आहे. त्याच्याशिवाय या ट्रेलरमधील आणखी एका गोड चेहऱ्याच्या मुलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ट्रेलरमध्ये आयुष्यामन या मुलीला मिठी मारताना आणि तिला वाचवताना दिसतो. ट्रेलरमध्ये एक सीन आहे, त्यात एक महिला या मुलीला थोबाडीत मारते. पार्लर वाली है या नेपालन है? असा प्रश्न ती महिला या मुलीला करते. ही मुलगी कोण आहे? हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर तिचं नाव Andrea Kevichusa. ती नागालँडची राहणारी आहे. तिची ओळख सांगायची झाल्यास ती एक मोठी मॉडेल आहे. मॉडेलिंगच्या दुनियेत तिचं मोठ नाव आहे. सब्यसाची मुखर्जीशिवाय अनेक इंटरनॅशनल डिझाइनर्ससोबत तिनं काम केलं आहे.
ऐकून आश्चर्य वाटेल पण बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबतही तिचं एक खास कनेक्शन आहे. होय, कतरिनासोबत तिने एका कॉस्मेटिक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. अँड्रियाला एका एजन्सीच्या माध्यमातून ‘अनेक’साठी सिलेक्ट करण्यात आलं.
अँड्रियाने वयाच्या 15 वर्षांपासून मॉडेलिंगला सुरूवात केली. शाळेत शिकत असतानाच तिची मॉडेलिंगच्या ग्लॅमरस दुनियेत एन्ट्री झाली. अँड्रिया म्हणायला मॉडेल आहे. ‘अनेक’ हा तिचा पहिला सिनेमा आहे. पण या सिनेमातील तिच्या अभिनयानं सगळ्यांना थक्क केलं आहे. ट्रेलरमध्ये त्याची झलक तुम्ही पाहू शकताच.
‘अनेक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं आहे. अनुभव सिन्हा यांनी याआधी थप्पड़, आर्टिकल 15, मुल्क यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. आता त्यांच्या ‘अनेक’ या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. येत्या 27 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.