टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:23 IST2023-03-24T10:13:17+5:302023-03-24T11:23:43+5:30

'बडे मिया छोटे मिया' चित्रपटाचं चित्रीकरण सध्या स्कॉटलंडमध्ये सुरु आहे.

While shooting with Tiger, Akshay got injured during the Vajale Bara, action scene | टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय?

टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय?

बॉलिवूडचा 'खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) अनेकदा सिनेमात स्वत:च स्टंट करतो. मात्र अशावेळी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असंच काहीसं अक्षयसोबत घडलंय. 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन सुरु असतानाच अक्षयला दुखापत झाली. तरी अक्कीने शूटिंग न थांबवता सीन पूर्ण केला. अभिनेता टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) अॅक्शन सीन शूट करताना अक्षयला दुखापत झाली.

'बडे मिया छोटे मिया' चित्रपटाचं चित्रीकरण सध्या स्कॉटलंडमध्ये सुरु आहे. मुंबईतील शेड्युल संपवून कलाकार स्कॉटलंडला रवाना झाले. सिनेमातून टायगर आणि अक्षय पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दोघांचा जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स शूट होत असताना अक्षयला दुखापतीला सामोरे जावे लागले. त्याच्या गुडघ्याला ब्रेसेस बसवण्यात आले आहेत. शूट वेळेत पूर्ण व्हावं म्हणून अक्षय क्लोजअप्ससह शूट करत होता. जास्त गंभीर दुखापत नसल्याने अक्षयने ब्रेक न घेता सीक्वेन्स पूर्ण केला. मात्र सध्या आता अॅक्शन सीन्स थांबवण्यात आले आहेत.

'बडे मिया छोटे मिया' मध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ सोबतच सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचीही भूमिका आहे. अली अब्बास जफर सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. त्याने 'टायगर जिंदा है', 'सुलतान', 'भारत' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. आता त्याचा आगामी 'बडे मिया छोटे मिया' येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: While shooting with Tiger, Akshay got injured during the Vajale Bara, action scene