किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:30 IST2023-03-13T15:30:00+5:302023-03-13T15:30:00+5:30

Aamitabh bachchan: 'गंगा की सौगंध' या सिनेमाच्या सेटवर एकाने चक्क बिग बींच्या कानशिलात लगावली होती.

when the monkey attack on amitabh bachchan big b share photo and told the whole story | किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात

किस्सा: माकडाला इग्नोर करणं बिग बींना पडलं महागात; चारचौघात वानराने लगावली कानशिलात

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (amitabh bachchan) या नावाचा कलाविश्वात चांगलाच दबदबा आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं. कलाविश्वातील त्यांचा दांडगा अनुभव पाहता अनेक नवोदित कलाकार त्यांच्याशी बोलताना घाबरतात. इतकंच काय तर ते दिसल्यावर वाटही बदलतात. पण,  'गंगा की सौगंध' या सिनेमाच्या सेटवर एकाने चक्क बिग बींच्या कानशिलात लगावली होती. खुद्द अमिताभ यांनीच हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

७० च्या दशकातील 'गंगा की सौगंध' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सुलतान अहमद यांच्या या चित्रपटाचं चित्रीकरण त्यावेळी हरिद्वारला सुरु होतं. या चित्रपटातील बरेचसे सीन हरिद्वार, लक्ष्मण झूला येथे पार पडले आहेत. याच ठिकाणी बिग बींना कानशिलात बसली होती.
कोणी मारली बिग बींच्या कानशिलात

चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर बिग बी लक्ष्मण झूल्यावरुन त्यांच्या हॉटेलकडे जात होते. यावेळी काही माकडांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला. त्यामुळे त्यांना बाजूला करुन पुढे जाण्यासाठी बिग बींनी त्यांच्या जवळ असलेली केळी या माकडांना देण्यास सुरुवात केली. यावेळीच एका माकडाने त्यांच्या श्रीमुखात लगावली.

माकडाने का लगावली बिग बींच्या श्रीमुखात?

अमिताभ बच्चन लहान माकडांना केळी खाण्यात गुंग झाले होते. यावेळी तेथे आणखी एक मोठं माकड बसलं होतं. मात्र, त्याच्याकडे बिग बींचं लक्ष नव्हतं. परिणामी, त्यांनी या माकडाला केळ दिलं नाही. या गोष्टीचा राग आल्याने ते माकड थेट बिग बींच्या अंगावर गेलं आणि त्याने त्यांच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे हा प्रकार इतका अनपेक्षितपणे घडला की काही मिनिटं कोणालाही काहीच समजलं नाही. मात्र, नंतर, साऱ्यांनाच हसू अनावर झालं.

दरम्यान, बिग बींनी बऱ्याच वर्षांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत घडलेला किस्सा सांगितला. 'गंगा की सौगंध' या चित्रपटात बिग बींसह अमजद खान, रेखा, प्राण, जीवन आणि सुलोचना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: when the monkey attack on amitabh bachchan big b share photo and told the whole story