रवीना टंडनने नवऱ्याच्या एक्स वाइफवर फेकलं होतं ज्यूस; 'हे' होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 18:48 IST2021-09-28T18:46:48+5:302021-09-28T18:48:02+5:30
Raveena tondon: बऱ्याचदा सेलिब्रिटींच्या रिलेशनशीप, ब्रेकअप किंवा पॅचअप याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे सध्या रवीना टंडनची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

रवीना टंडनने नवऱ्याच्या एक्स वाइफवर फेकलं होतं ज्यूस; 'हे' होतं कारण
बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. यात बऱ्याचदा सेलिब्रिटींच्या रिलेशनशीप, ब्रेकअप किंवा पॅचअप याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे सध्या कलाविश्वातील अशाच एका दिग्गज अभिनेत्रीची लव्हलाइफ चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याच्या एक्स वाइफवर भर पार्टीत ज्युस फेकलं होतं. इतकंच नाही तर आपण पार्टीत असल्याची जराही तमा न बाळगता तिने नवऱ्याच्या एक्स वाइफला खडे बोल सुनावले होते.
'पत्थर के फूल' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. १९९० चा काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रोफेशन लाइफसोबतच तिचं पर्सनल लाइफदेखील कायमच चर्चेत येत असतं. विशेष म्हणजे याच रवीनाने तिच्या नवऱ्याच्या एक्स पत्नीवर म्हणजेच नताशावर ज्यूस फेकलं होतं.
अभिनेता कुणाल कपूर आहे बिग बींचा जावई; बच्चन कुटुंबातील 'या' मुलीशी केलंय त्याने लग्न
रितेश सिधवानी यांनी आयोजित केलेल्या न्यू इअर पार्टीमध्ये रवीना पती अनिल थडानीसोबत गेली होती. यावेळी अनिलची एक्स वाइफ नताशादेखील आली होती. परंतु, अनिलला पाहिल्यावर नताशा वारंवार त्यांच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होती. बराच वेळ नताशाचं हे वागणं पाहिल्यावर रवीनाला राग आला आणि तिने रागाच्या भरात नताशावर ज्यूस फेकलं.
"जर भर पार्टीत माझ्या पतीचा अपमान करायचा प्रयत्न करत असशील तर त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल. मी अजिबात असं काही चुकीचं खपवून घेणार नाही", असं रवीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. तर"रवीना त्यावेळी इनसिक्योर होती", असं मत नताशाचं होतं.
दरम्यान,२००३ मध्ये अनिल थडानी यांनी रवीनाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला जवळपास १७ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे.