अभिनेता कुणाल कपूर आहे बिग बींचा जावई; बच्चन कुटुंबातील 'या' मुलीशी केलंय त्याने लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:15 PM2021-09-28T18:15:00+5:302021-09-28T18:15:00+5:30

Amitabh bachchan: ज्याप्रमाणे बिग बींची सून कलाविश्वात सक्रीय आहे. तसाच त्यांचा जावईदेखील आहे.

amitabh bachchan neice and kunal kapoor wife naina bachchan look hot and glamorous | अभिनेता कुणाल कपूर आहे बिग बींचा जावई; बच्चन कुटुंबातील 'या' मुलीशी केलंय त्याने लग्न

अभिनेता कुणाल कपूर आहे बिग बींचा जावई; बच्चन कुटुंबातील 'या' मुलीशी केलंय त्याने लग्न

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बींचा जावई अलिकडेच The Empire या सीरिजमध्ये झळकला होता

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता किती आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. बिग बींचे चित्रपट ज्या पद्धतीने बॉक्स ऑफिसवर गाजत असतात. तशीच त्यांची पर्सनल लाइफही कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.  विशेष म्हणजे अनेकांना बिग बींच्या कुटुंबाविषयी, घराविषयी कुतुहल असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा चाहत्यांच्या प्रयत्न असतो. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील निम्म्याहून अधिक सदस्य कलाविश्वाशी निगडीत आहेत. यात त्यांच्या सुनबाईचाही समावेश आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु, ज्याप्रमाणे बिग बींची सून कलाविश्वात सक्रीय आहे. तसाच त्यांचा जावईदेखील आहे. मात्र, त्यांच्या जावयाविषयी फार कमी जणांना माहित आहे.

बिग बींच्या सुनेप्रमाणेच त्यांचा जावईदेखील अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे बिग बींचा जावई लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्याने बिग बींच्या भाचीसोबत लव्ह मॅरेज केलं आहे.

पाठक बाईंसोबत वीणाची भटकंती; पाहा अभिनेत्रींचा सफरनामा

अमिताभ बच्चन यांच्या जावयाचं नाव कुणाल कपूर असून त्याने बिग बींच्या भाचीसोबत म्हणजेच  नैना बच्चनसोबत लग्न केलं आहे. नैना ही बिग बींच्या भावाची अजिताभ बच्चनची मुलगी आहे. तसंच ती एक इनवेस्टमेंट बँकर आहे. नैना आणि कुणालने ९ फेब्रुवारी २०१५ साली कुटुंबाच्या संमतीने लग्न केलं. श्वेता बच्चन-नंदामुळेच नैना व कुणालची पहिली भेट झाली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. 

खऱ्या आयुष्यात नेहाची वहिनी आहे प्रचंड ग्लॅमरस; जाणून घ्या तिच्या रिअल 
 

"आमची भेट करण जोहरच्या एका फॅशन शोमध्ये झाली होती. मी रॅम्प वॉक करायला जात असतानाच करणने मला वाटेत थांबवलं. त्याचवेळी माझी आणि नैनाची भेट झाली", असं कुणालने सांगितलं.

नैना, अभिषेक आणि श्वेता यांची चुलत बहीण आहे. नैनाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. निलिमा आणि निमृता या बहिणी असून भीम असं तिच्या सख्ख्या भावंडांचं नाव आहे.
 

Web Title: amitabh bachchan neice and kunal kapoor wife naina bachchan look hot and glamorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.