या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 14:11 IST2019-02-27T14:03:19+5:302019-02-27T14:11:24+5:30

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती.

When Jaya Bachchan praised Aishwarya Rai Bachchan for her family values and compared her with Karisma Kapoor | या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती

या कारणामुळे जया बच्चनने करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली पसंती

ठळक मुद्देया मुलाखतीत त्यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी देखील खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत. जया बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले होते की, याच कारणामुळे करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न मोडले होते का? त्यावर जया बच्चन यांनी काही सेकंद थांबून उत्तर दिले होते. त्यांच्या या पॉजमध्ये उत्तर असल्याचे सगळ्यांनाच कळले होते.

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे काही वर्षांपूर्वी लग्न ठरले होते. त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता हे सगळ्यांना माहीत आहे. करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत तर करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले. काहीच वर्षांत संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट झाला. 

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ही मुलाखत २००८ मध्ये छापून आली होती.

जया बच्चन यांनी या मुलाखतीत त्यांच्या कुटूंबाची मूल्ये, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कशाप्रकारे संस्कार दिले याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. तसेच या मुलाखतीत त्यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी देखील खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत. 

जया बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले होते की, याच कारणामुळे करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न मोडले होते का? त्यावर जया बच्चन यांनी काही सेकंद थांबून उत्तर दिले होते. त्यांच्या या पॉजमध्ये उत्तर असल्याचे सगळ्यांनाच कळले होते. त्यानंतर काही सेकंदानंतर त्यांनी उत्तर दिले होते की, करिश्मा ही कपूर कुटुंबातील आहे. कपूर कुटुंबातील सगळ्यांनाच खूप चांगले संस्कार आहेत. तिचे वडील आणि मी अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यांचे माझ्या पतीसोबत देखील खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुटुंबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये असे मला वाटते.

Web Title: When Jaya Bachchan praised Aishwarya Rai Bachchan for her family values and compared her with Karisma Kapoor