जया बच्चन यांनी या कारणामुळे करिश्मा कपूर नव्हे तर ऐश्वर्या रायला बनवले बच्चन कुटुंबाची सून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 20:20 IST2019-06-05T20:12:39+5:302019-06-05T20:20:37+5:30

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे.

When Jaya Bachchan COMPARED Karisma Kapoor With Her 'BAHU' Aishwarya Rai Bachchan Over Family Values | जया बच्चन यांनी या कारणामुळे करिश्मा कपूर नव्हे तर ऐश्वर्या रायला बनवले बच्चन कुटुंबाची सून?

जया बच्चन यांनी या कारणामुळे करिश्मा कपूर नव्हे तर ऐश्वर्या रायला बनवले बच्चन कुटुंबाची सून?

ठळक मुद्देजया बच्चन यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत. 

अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या वेबसिरिजद्वारे करिश्मा कपूर अभिनयक्षेत्रात पुनरागमन करत आहे. एका आईच्या आयुष्यात किती चढ-उतार येतात हे प्रेक्षकांना या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. करिश्माच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे.

नव्वदीच्या दशकात करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर काहीच वर्षांत तिचा अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला. बच्चन कुटुंबियांसोबत ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असे. त्यामुळे आता अभिषेक आणि तिचे लवकरच लग्न होईल असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांचा साखरपुडा मोडला. काही वर्षांनंतर तिने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. आज करिश्मा एकटीच तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. 

 

करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत. 

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ही मुलाखत २००८ मध्ये छापून आली होती.

जया बच्चन यांनी या मुलाखतीत त्यांच्या कुटूंबाची मूल्ये, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कशाप्रकारे संस्कार दिले याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. तसेच या मुलाखतीत त्यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी देखील खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत. 

जया बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले होते की, याच कारणामुळे करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न मोडले होते का? त्यावर जया बच्चन यांनी काही सेकंद थांबून उत्तर दिले होते. त्यांच्या या पॉजमध्ये उत्तर असल्याचे सगळ्यांनाच कळले होते. त्यानंतर काही सेकंदानंतर त्या म्हणाल्या होत्या की, करिश्मा ही कपूर कुटुंबातील आहे. कपूर कुटुंबातील सगळ्यांनाच खूप चांगले संस्कार आहेत. तिचे वडील आणि मी अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहोत. त्यांचे माझ्या पतीसोबत देखील खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुटुंबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये असे मला वाटते.

Web Title: When Jaya Bachchan COMPARED Karisma Kapoor With Her 'BAHU' Aishwarya Rai Bachchan Over Family Values