"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:53 IST2025-10-20T09:52:22+5:302025-10-20T09:53:17+5:30
Rakhi Sawant Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया सध्या आयटम साँग करत आहे आणि कौतुकाची थाप मिळवित आहे. हे पाहून आता राखी सावंतने तिच्यावर निशाणा साधला आहे.

"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने घोषणा केली की, ती कायमची भारतात परतत आहे आणि तिच्या कमबॅकसाठी पूर्णपणे सज्ज आहे. राखी सावंत आयटम साँगसाठी ओळखली जाते आणि आतापर्यंत तिने बऱ्याच गाण्यातून आपल्या दिलखेचक नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. यादरम्यान आता राखीने तमन्ना भाटियावर निशाणा साधला आहे. कारण ती सध्या आयटम साँग करत आहे आणि कौतुकाची थाप मिळवित आहे.
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतला सांगितलं गेलं की, चाहत्यांचं म्हणणं आहे की, तमन्नाच्या आयटम साँग्समध्ये जी मज्जा नाही, जी राखीच्या गाण्यात असते. त्यावर राखी म्हणाली की, हे लोक आम्हाला बघून बघून आयटम साँग करायला शिकले. त्यांना आधी हिरोईन बनायचं होतं, जेव्हा ह्यांचं अभिनेत्री म्हणून करिअर चाललं नाही, तेव्हा आमच्या पोटावर लाथ मारुन आयटम साँग करू लागले. लाज बाळगा. ओजी तर आम्हीच आहोत आणि आता आम्ही हिरोईन बनणार.
आदिल खानसोबत राखी झाली विभक्त
काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीचा घटस्फोट चर्चेत आला होता. दोघांनी लग्नाच्या एक वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अभिनेत्रीने धक्कादायक आरोप केले होते. कोर्टाच्या कारावाईदरम्यान राखी दुबईत शिफ्ट झाली होती. नुकतेच राखी आणि आदिलने एकमेकांच्या सहमतीने कोर्टाच्या बाहेर सर्व मुद्दे सोडवले आहेत. कारण दोघांना आपापल्या जीवनात पुढे जायचे होते. बॉम्बे हायकोर्टाने केस रद्द केली आहे. यावर राखी म्हणाली की, कायदेशीर कारवाई संपवण्यासाठी तिची काहीच हरकत नाहीये.
'पति पत्नी और पंगा'मध्ये दिसली ड्रामा क्वीन
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर राखी सावंत अलिकडेच 'धमाल विद पति पत्नी और पंगा' शोमध्ये दिसली. तिने तिच्या एन्ट्रीने शोची रंगत वाढवली आणि धुमाकूळ घातला. अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनदरम्यान राखीने अभिषेकला पाहिलं आणि ड्रामेबाज अंदाजात घोषणा केली की, मला नवरा मिळाला.