अभिनेत्रीची 'नो किसिंग' पॉलिसी! सीनदरम्यान चुकून सहअभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श झाला अन् केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:06 IST2025-10-28T12:54:53+5:302025-10-28T13:06:17+5:30
पडद्यावर टाळले लिप-लॉक सीन्स! सीनदरम्यान चुकून सहअभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श झाला अन् अभिनेत्रीने केलेलं असं काही...

अभिनेत्रीची 'नो किसिंग' पॉलिसी! सीनदरम्यान चुकून सहअभिनेत्याच्या ओठांचा स्पर्श झाला अन् केलं असं काही...
Raveena Tandon: ९० च्या दशकातील अनेक गाण्यांमधील आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी प्रसिध्द अभिनेत्री रवीना टंडन. ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून लोकप्रिय असलेली रवीना टंडन फक्त आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर आपल्या बेधडकपणासाठीही ओळखली जाते.'पत्थर के फूल' या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून तिला खरी ओळख मिळाली होती. पदार्पणाच्या चित्रपटालाच यश मिळाल्याने, एकाच चित्रपटात रवीना अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावली. या चित्रपटानंतर त्यांना दिलवाले हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याकाळातील सर्वाधिक कमाई केली. पण तिने नेहमी स्वतःच्या तत्वांवर आणि अटींवरच काम केले.
रवीनाने कधीही चित्रपटांत किसिंग सीन दिला नाही. एकदा असं झालं की एका हिरोचे ओठ तिच्या ओठांना लागले, तेव्हा अभिनेत्रीने लगेच दात घासले आणि तिला उलटीसुद्धा झाली होती. एका मुलाखतीमध्ये रवीनाने याबाबत खुलासा केला होता.
नो किसिंग पॉलिसीबद्दल रवीना म्हणाली...
त्यादरम्यान, नो किसिंग पॉलिसीबद्दल अभिनेत्री म्हणाली, "चित्रपटांमध्ये असे सीन्स न करणं हा माझा निर्णय होता. मी त्यात कम्फर्टेबल नव्हते.जर राशाला कधी चित्रपटांमध्ये असे काही करायचे असेल तर ती करू शकते.फक्त त्यासाठी ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. जर ती अस्वस्थ असेल तर कोणीही तिला असे सीन्स करण्यास भाग पाडू शकत नाही." असं स्पष्ट वक्तव्य रवीनाने मुलाखतीमध्ये केलं होतं.
वर्कफ्रंट
रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपटातून कामे केली यात मोहरा, खिलाडियों का खिलाडी, जिद्दी, अंदाज अपना अपना, अक्स, घरवाली बाहरवाली, लाडला. व्यावसायिक चित्रपटांसोबत रविना यांनी गंभीर भूमिका साकारण्यासाठीदेखील मेहनत घेतली आहे. तिच्या 'दमन' या चित्रपटाकरिता रवीनाला राष्ट्रीय पुरस्कार गोविंदासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर आवडली.