'ती कधीही सोडून जाऊ नये असं वाटतं'; मलायकाबाबत अरबाजचं ते वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:58 IST2022-03-18T17:57:33+5:302022-03-18T17:58:54+5:30
Arbaaz khan:एका मुलाखतीमध्ये त्याने मलायकाचा विरह सहन करु शकत नाही, असंही म्हटलं होतं.

'ती कधीही सोडून जाऊ नये असं वाटतं'; मलायकाबाबत अरबाजचं ते वक्तव्य चर्चेत
एकेकाळी कलाविश्वात मलायका अरोरा आणि अरबाज खान यांना जोडीकडे परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. एका फोटोशूटच्या दरम्यान, पहिल्यांदाच भेट झालेल्या मलायका- अरबाजने १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, तब्बल १९ वर्षानंतर त्यांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये ही जोडी विभक्त झालं. परंतु, अरबाजचं मलायकावर आतोनात प्रेम होतं. एका मुलाखतीमध्ये त्याने मलायकाचा विरह सहन करु शकत नाही, असंही म्हटलं होतं.
सध्या सोशल मीडियावर अरबाजच्या एका जुन्या इंटरव्ह्यूची चर्चा होत आहे. यामध्ये त्याने मलायकावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. इतकंच नाही मलायकाबाबत तो किती पझेसिव्ह आहे हेदेखील त्याच्या बोलण्यातून दिसून येत होतं.
तुम्हाला आवडणारी व्यक्ती ज्यावेळी तुमच्या आयुष्यात येते त्यावेळी ती कधीही तुम्हाला सोडून जाऊ नये असंच प्रत्येकाला वाटत असतं. सुरुवातीच्या काळात मी मलायकाबाबत इतका पझेसिव्ह नव्हतो.परंतु, नंतर हळूहळू पझेसिव्ह होऊ लागलं, असं अरबाज म्हणाला होता.
दरम्यान, जवळपास १९ वर्ष संसार केल्यानंतर या दोघांचे मार्ग वेगळे झाले. सध्या अरबाज इटालियन मॉडल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायकाने त्यांचं नातं जाहीरपणे मान्य देखील केलं आहे.