जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 17:49 IST2021-03-21T17:47:53+5:302021-03-21T17:49:43+5:30
अक्षय कुमारचे नाव नेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. ट्विंकलसोबत लग्न केल्यानंतरही अक्षयच्या अफेअरच्या चर्चा थांबल्या नाहीत.

जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही....
अक्षय कुमारचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. या लिस्टमध्ये शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि आयशा जुल्काचे नाव सामिल आहे. शेवटी त्याने ट्विंकल खनासोबत लग्न केले. पण ट्विंकलसोबत लग्न केल्यानंतरही अक्षयच्या अफेअरच्या चर्चा थांबल्या नाहीत. होय, म्हणायला अक्षय ट्विंकलचा होता. पण सेटवरून त्याच्या आणि प्रियंका चोप्राच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरु झाल्या होत्या. इतक्या की या चर्चांनी ट्विंकल सुद्धा सैरभैर झाली होती.
असे म्हणतात की, ‘ऐतराज’च्या सेटवर प्रियंका व अक्षय यांची जवळीक वाढली. याच सिनेमाच्या शूटींगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. या सिनेमात प्रियंका निगेटीव्ह रोलमध्ये होती. सिनेमात अक्षय व प्रियंकाचे काही बोल्ड सीन्ही होते.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंकासोबत किसींग सीन देताना अक्षयचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. तो या सीनमध्ये इतका एकरूप झाला होती की, डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही प्रियंकाला किस करत राहिला होता.
चर्चा खरी मानाल तर, ही गोष्ट ट्विंकलच्या कानापर्यंत गेली आणि ती रागाने लाल झाली. तिने आधीच अक्षयकुमारला प्रियंकापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र अक्षयवर फारसा असर पडला नव्हता. असे म्हणतात की, यानंतर तिने अखेर थेट प्रियंकाशीच बोलणे पसंत केले. मग काय फोन कॉलवर प्रियंका व ट्विंकल दोघींमध्ये जबरदस्त भांडण झाले. यानंतर अक्षयलाही तिने खडसावले. यानंतर प्रियंकासोबत कधीही काम करायचे नाही, हे तिने अक्षयच्या तोंडून वदवून घेतले आणि तेव्हाच कुठे ती शांत झाली. यानंतर अक्षयने कधीच प्रियंकासोबत काम केले नाही.