WHAT?? आम्हाला ‘दबंग3’ नको! सोशल मीडियावर छेडली मोहिम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 13:58 IST2018-06-28T13:57:00+5:302018-06-28T13:58:28+5:30

‘रेस3’नंतर भाईजान ‘दबंग3’वर काम सुरू करणार आहे. खरे तर ही सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पण खुद्द चाहते याघडीला एक भलतीच मागणी करू लागले आहेत

WHAT ?? We do not want 'Dabang 3'! Campaign on social media ! | WHAT?? आम्हाला ‘दबंग3’ नको! सोशल मीडियावर छेडली मोहिम!!

WHAT?? आम्हाला ‘दबंग3’ नको! सोशल मीडियावर छेडली मोहिम!!

ठळक मुद्दे#WeDon’tWantDabangg3 सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. 

सलमान खानच्या ‘रेस3’ या चित्रपटाला केवळ आणि केवळ भाईजानच्या चाहत्यांनी तरले़  हा चित्रपट पाहून समीक्षकांची निराशा झाली. पण भाईजानच्या चाहत्यांनी मात्र हा चित्रपट डोक्यावर घेतला. इतका की, केवळ पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. आत्तापर्यंत या चित्रपटाने १६० कोटींवर कमाई केली आहे. ‘रेस3’नंतर भाईजान ‘दबंग3’वर काम सुरू करणार आहे. खरे तर ही सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पण खुद्द चाहते याघडीला एक भलतीच मागणी करू लागले आहेत. होय, ‘दबंग3’ बनू नये, अशी मागणी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे रेटली आहे. केवळ मागणीचं नाही तर आता या मागणीने मोहिमेचे रूप घेतले आहे. अनेक लोक या मोहिमेत सामील होताना दिसत आहेत. 

परिणामी   #WeDon’tWantDabangg3 सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.  ‘दबंग3’ का बनू नये, यामागची कारणेही लोकांनी स्पष्ट केली आहेत. चुलबूल पांडे हिंदी सिनेमाचे आयकॉनिक पात्र आहे. सुमार कास्ट, सुमार निर्देश आणि तितकीच सुमार कथेसह आम्ही या आयकॉनिक पात्राचे धिंडवडे निघताना बघू शकत नाही, असे या लोकांचे म्हणणे आहे.

आता सलमान या लोकांचे ऐकणार का? लोकांच्या मोहिमेनंतर ‘दबंग3’ बनवण्याचा इरादा सोडून देणार का? असे प्रश्न आहेत. कदाचित सलमान ऐकेल किंवा कदाचित एका जबरदस्त कथेसह ‘दबंग3’ आणून लोकांना सडेतोड उत्तरही देईल. शेवटी सल्लूभाईला कोण ‘अंडरइस्टिमेट’ करू शकलयं???

Web Title: WHAT ?? We do not want 'Dabang 3'! Campaign on social media !