'जीवन प्रवाह आहे अन्... '; सहा वर्षांनंतर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री करणार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 17:45 IST2022-01-03T17:45:00+5:302022-01-03T17:45:00+5:30
Soha ali khan: 'कौन बनेगा शेखावती' मध्ये सोहा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने ती ६ वर्षांनी कलाविश्वात पुन्हा पदार्पण करत आहे.

'जीवन प्रवाह आहे अन्... '; सहा वर्षांनंतर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री करणार कमबॅक
बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला असे अनेक कलाकार आहेत. जे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. परंतु, यश उपभोग असतानाच त्यांनी कलाविश्वातून काढता पाय घेतला. यात खासकरुन अशा अभिनेत्री आहेत. ज्यांनी करिअरपेक्षा आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. यातलच एक नाव म्हणजे सोहा अली खान(soha ali khan). जवळपास ६ वर्ष कलाविश्वापासून सोहा दूर होती. परंतु, आता तिने पुन्हा एकदा आपल्या करिअरवर फोकस केला आहे. सोहा लवकरच 'कौन बनेगा शेखावती' (Kaun Banega Shekhawati) या ओटीटी शोमध्ये झळकणार आहे. त्यापूर्वी तिने एका मुलाखतीमध्ये सहा वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा कलाविश्वात पदार्पण करताना कसं वाटतंय हे सांगितलं.
"सहा वर्षांनंतर मी कलाविश्वात सक्रीय होतीये पण ही माझी नवी सुरुवात आहे असं मी म्हणणार नाही. कारण, मी माझं आयुष्य वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असल्यासारखं जगत नाही. जीवन हा एक प्रवाह आहे आणि त्या प्रवाहासोबत मी वाहत असते. ज्यावेळी मला आई व्हायचं होतं त्यावेळी मी माझं घर, कुटुंब याकडे लक्ष दिलं. मला पुस्तक लिहायचं होतं, मी लिहिलं. इनायासोबत मी तीन वर्ष छान एन्जॉय केले आहेत. पण, त्यानंतर आता मला माझ्यासाठी काही तरी करायला हवं असं वाटलं त्यावेळी मी या शोच्या माध्यमातून कामाची सुरुवात करण्याचं ठरवलं", असं सोहा म्हणाली.
पुढे ती म्हणते,"गेल्या दीड वर्षांमध्ये मी एक चांगली आई असण्यासोबतच एक वर्किंग वूमनही होऊ शकते हा आत्मविश्वास आता माझ्यात निर्माण झाला आहे."
दरम्यान, 'कौन बनेगा शेखावती' मध्ये सोहा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यात ती राजकुमारी गायत्री शिखरवती ही भूमिका साकारणार असून ही शो झी वर येत्या ७ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.