संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:10 IST2025-04-29T18:09:59+5:302025-04-29T18:10:28+5:30
'रामायण' चित्रपटाबद्दलचं मोठ अपेडट समोर आलं आहे.

संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे?
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan ) या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. तगड्या स्टार कास्टसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण' हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. या चित्रपटात साई पल्लवी ही माता सीतेच्या भूमिकेत आहे. तर रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाबद्दल रोज नवनवीन माहिती आणि सेटवरील फोटो समोर येत असतात. पण, निर्मात्यांनी अधिकृतरित्या अद्याप चित्रपटाशी संबंधित कोणतीही झलक दाखवलेली नाही. पण, आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
रणबीर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मेगा बजेट चित्रपटावरून लवकरच पडदा उचलला जाणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांना कधी पाहता येईल हे निर्मात्यांनी सांगितले आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलक येत्या २०२५ च्या वेव्हज समिटमध्ये दाखवली जाईल. 'रामायण'हा चित्रपट दोन भागात बनवला जात आहे. 'रामायण'चा पहिला भाग दिवाळी २०२६ ला आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि साई पल्लवीशिवाय या चित्रपटात रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
वेव्हज समिट २०२५ म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने १ ते ४ मेदरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (वेव्हज २०२५) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरणही अनेक दिवसांपासून सुरू आहे. . बॉलीवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्माते कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.