Waves Summit 2025: प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीनाच्या उत्तराने जिंकलं मन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:40 IST2025-05-02T16:30:35+5:302025-05-02T16:40:24+5:30

प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीना कपूर म्हणाली...

waves summit 2025 kareena kapoor talk about why she doesnt work in hollywood films  | Waves Summit 2025: प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीनाच्या उत्तराने जिंकलं मन 

Waves Summit 2025: प्रियंकाप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? करीनाच्या उत्तराने जिंकलं मन 

Waves Summit 2025: मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये काल झालेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात 'वेव्हज' परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. वेव्हजच्या निमित्ताने मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपट सृष्टीतील तारे-तारका येथे उपस्थित होते. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, शाहरूख खान, मोहनलाल आणि जगभरातील सेलिब्रिटी या समिटमध्ये अवतरले होते. या परिषदेत अभिनेत्री करीना कपूरने केलेल्या एका वक्तव्याची सगळीकडे चर्चा होत आहे. 

आज Waves समिटमध्ये करीनाला ती प्रियंका चोप्रा किंवा इतर अभिनेत्रींप्रमाणे हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का करत नाही? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना करीना म्हणाली, "मी तर इकडेच ठिक आहे. मी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करुन खुश आहे. मला हिंदी गाण्यांवर डान्स करायला आणि हिंदी डायलॉग्ज बोलायला सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर करीनाने तिच्या एका चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला.  'भटिंडा की सीखडी हूं' हा डायलॉग बोलायला मला प्रचंड आवडतं. माझं स्वत: वर खूप प्रेम आहे. आता हा डायलॉग बघा तो बोलण्यात किती मजा येते. मला तर वाटतं प्रत्येक मुलीने तसेच महिलेने हा डायलॉग म्हणायला पाहिजे. कारण तो प्रत्येक स्त्रीला समर्पित आहे." असं करीना म्हणाली.

त्याचबरोबर ही Waves समिटमध्ये जगभरातील चित्रपट निर्माते, स्टार्टअप्स, तसेच मनोरंजन क्षेत्रातील उद्योजक आदी एकत्र आले आहेत. वेव्हज समिट भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल इनोव्हेशनचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

मराठी कलाकारांचीही उपस्थिती...

दरम्यान, कालपासून सुरु झालेल्या या परिषदेत महेश कोठारे, मृणाल कुलकर्णी, अलका कुबल, निशिगंधा वाड, अमृता खानविलकर, सचिन खेडेकर, श्रवणी देवधर, इला भाटे, महेश लिमये, दिग्दर्शक स्वप्ना जोशी वाघमारे, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, ओम राऊत आदी मराठी कलावंत दिसून आले. कलाकारांमध्ये यावेळी गप्पा रंगलेल्याही पहायला मिळाल्या.

Web Title: waves summit 2025 kareena kapoor talk about why she doesnt work in hollywood films 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.