हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'वॉर २' या सिनेमाचं अपडेट आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:18 IST2025-03-17T12:17:38+5:302025-03-17T12:18:13+5:30
'यशराज फिल्मस'चे स्पाय युनिव्हर्स चित्रपटांमध्ये खास कॅमिओ पाहायला मिळतात,

हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'वॉर २' या सिनेमाचं अपडेट आलं समोर
War 2 Release Date: 'यशराज फिल्मस'ची (YRF) 'स्पाय युनिव्हर्स'चा (SPY Universe) मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांची आवड आणि मागणी लक्षात घेऊन निर्मातेही एकापाठोपाठ एक स्पाय चित्रपट घेऊन येत आहेत. बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशन आणि टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2' या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे.
सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या 'टायगर ३' चित्रपटानंतर 'वॉर २' ची चर्चा वाढली होती. आता या सिनेमाचं अपडेट आलं आहे. यशराज फिल्म्सने २०० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'वॉर २' हा १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी 'वॉर २' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'यशराज फिल्मस'कडून एक व्हिडीओ रिट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये 'स्पाय युनिव्हर्स'च्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
Must say… you have set it up brilliantly even before we have started our marketing of #War2 🔥😎💥😱💪 ... there will be mayhem in cinemas on 14 August 2025, worldwide… 😈⚠️‼️🚨🤯 https://t.co/eVmQRLLJtG
— Yash Raj Films (@yrf) March 16, 2025
'वॉर 2' हा 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर'चा सिक्वेल आहे. 'वॉर' मध्ये सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, यात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते, तर वाणी कपूर, आशुतोष राणा आणि अनुप्रिया गोएंका सहाय्यक भूमिकेत आहेत.
'यशराज फिल्मस'चे स्पाय युनिव्हर्सचे 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि 'टायगर ३' हे चार चित्रपट याआधी प्रदर्शित झालेले आहेत. 'यशराज फिल्मस'चे स्पाय युनिव्हर्स चित्रपटांमध्ये खास कॅमिओ पाहायला मिळतो. शाहरुखच्या 'पठाण' (२०२३) मध्ये सलमानने छोटी भूमिका साकारली होती, तर शाहरुख खानने 'टायगर ३' मध्ये कॅमिओ केला होता. आता 'वॉर २' मध्ये कोणत्या पात्रांची छोटी भूमिका असेल हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.