Wake Up Sid 2 येतोय? रणबीर कपूर अन् कोंकणा सेनचा सेटवरील Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 15:02 IST2024-01-02T14:48:05+5:302024-01-02T15:02:59+5:30

'वेक अप सिड' या सिनेमाचा मोठा चाहतावर्ग आहे.

'Wake Up Sid 2' on cards ? Video of Ranbir Kapoor and Konkona Sen on the set goes viral | Wake Up Sid 2 येतोय? रणबीर कपूर अन् कोंकणा सेनचा सेटवरील Video व्हायरल

Wake Up Sid 2 येतोय? रणबीर कपूर अन् कोंकणा सेनचा सेटवरील Video व्हायरल

अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) गेल्या वर्षात Animal हा सुपरहिट सिनेमा दिला. रणबीरला पहिल्यांदाच अशा जॉनरच्या सिनेमात पाहिलं गेलं. पण रणबीरचे 'बर्फी','वेक अप सिड' हे चित्रपट आठवले की हा तोच रणबीर आहे का असा प्रश्न पडतो. त्या सिनेमांमध्ये त्याचा एक वेगळाच Innocence होता.  २००९ साली आलेलाअयान मुखर्जी दिग्दर्शित 'वेक अप सिड' (Wake Up Sid 2) सिनेमा त्यापैकीच एक. आता १५ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वल येतोय का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण रणबीर कपूर, कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen) आणि सिनेमाच्या इतर कास्टचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'वेक अप सिड' सिनेमात रणबीरने सिद्धार्थ मेहराची भूमिका साकारली होती. असा मुलगा जो नुकताच कॉलेजमधून पास झाला आहे आणि आयुष्यात पुढे काय करायचं याबाबत तो गोंधळलेला आहे. वडील श्रीमंत आहेत त्यांचा बिझनेस आहे मात्र सिद्धार्थला वडिलांच्या बिझनेसमध्ये अजिबात रस नाहीए. तर दुसरीकडे आएशाच्या भूमिकेत दिसलेली कोंकणा सेन शर्मा जी कोलकत्याहून मुंबईत आली आहे आणि वयाने मोठी आहे. तिचे गोल्स सेट आहेत. आएशा आणि सिद्धार्थ यांच्या भेटीची, प्रेमाची ही कहाणी अगदी सुंदररित्या सिनेमात दाखवण्यात आली आहे. शिवाय मुंबई शहराचं चित्रण अप्रतिमरित्या सिनेमात केलेलं दिसतं. 

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ रणबीर कपूर दिसत असून त्याच्या हातात स्क्रीप्ट आहे. आजूबाजूला क्रू मेंबर्स आहेत तर मागून कोंकणा सेनचीही झलक दिसते. तेव्हा 'वेक अप सिड 2' ची तर तयारी नाही ना असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर 'वेक अप सिड 2' च्या चर्चेला उधाण आलंय. अद्याप मेकर्सकडून मात्र यावर काहीच स्पष्टीकरण आलेले नाही. 

Web Title: 'Wake Up Sid 2' on cards ? Video of Ranbir Kapoor and Konkona Sen on the set goes viral