स्टारकिड असूनही वहिदा रहमानची लेक राहते अत्यंत साधी; नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 16:19 IST2023-03-01T16:18:38+5:302023-03-01T16:19:53+5:30
kashvi rekhy: काश्वी, वहिदा रहमान यांच्या इतकीच सुंदर दिसत असून ती कलाविश्वापासून दूर असल्याचं म्हटलं जातं.

स्टारकिड असूनही वहिदा रहमानची लेक राहते अत्यंत साधी; नेटकरी करतायेत कौतुकाचा वर्षाव
उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर अभिनेत्री वहिदा रहमान (waheeda rehman) यांनी ७० चा काळ गाजवला. 'गाईड', 'प्यासा', 'कागज के फूल' आणि 'नीलकमल' हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. वहिदा रहमान यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांच्या पर्सनल लाईफचीही बरीच चर्चा रंगली. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लेकीची चर्चा होताना दिसते.
वहिदा रहमान यांनी कमलजीत यांच्याशी लग्न केलं. त्यांना सोहेल रेखी आणि काश्वी रेखी (kashvi rekhy) ही दोन मुलं आहेत. यात सध्या त्यांची लेक काश्वीची चर्चा होत आहे. काश्वी, वहिदा रहमान यांच्या इतकीच सुंदर दिसत असून ती कलाविश्वापासून दूर असल्याचं म्हटलं जातं.
सध्या सोशल मीडियावर काश्वीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती वहिदा रहमान यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. विशेष म्हणजे एक स्टारकिड असूनही काश्वी अत्यंत साधेपणाने राहत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.