रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:37 IST2025-10-28T16:36:37+5:302025-10-28T16:37:19+5:30
'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयला मिळाली 'ही' भूमिका, म्हणाला...

रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची अनेकदा चर्चा असते. सिनेमाचं बजेट तब्बल ४ हजार कोटी आहे. रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. सिनेमातली इतर स्टारकास्टही तगडी आहे. यश, सनी देओल, अरुण गोविल, आदिनाथ कोठारे, लारा दत्ता असे अनेक कलाकार सिनेमात आहेत. दरम्यान विवेक ओबेरॉयही या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे विवेकने यासाठी मानधनही नाकारल्याचा खुलासा झाला आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉय म्हणाला, "मी निर्माते नमित मल्होत्रा यांना कळवलं की मला सिनेमासाठी एकही रुपया नको. त्यापेक्षा ते पैसे मी कॅन्सर पीडित मुलांना दान करतो. मला वाटतं रामायण पार्ट १ हा हॉलिवूड महाकाव्यांना बॉलिवूडने दिलेलं एक उत्तर आहे." विवेक ओबेरॉय 'रामायण' सिनेमात बिभीषणच्या भूमिकेत आहे.
विवेक ओबेरॉय आगामी काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. त्याचा 'मस्ती ४'लवकरच रिलीज होणार आहे. शिवाय संदीप रेड्डी वांगा आणि प्रभासच्या 'स्पिरीट'या बहुचर्चित सिनेमातही त्याची भूमिका आहे. तो म्हणाला, "असं म्हणतात की तुमच्या व्हायब्रेशन आणि भावनांवर ब्रह्मांड अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही आनंदी असता, कोणत्याही तणावात नसता, तेव्हा गोष्टी आपोआपच ठीक होतात. मी निश्चिंत आहे, अनेक स्क्रिप्ट्स वाचत आहे आणि कोणतीही स्क्रिप्ट मी नाईलाजाने नाही तर पॅशनने निवडत आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो."