करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना विवेक अग्निहोत्रींचे विचित्र हावभाव, फोटोतूनही केलं क्रॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:12 PM2023-10-18T15:12:17+5:302023-10-18T15:12:45+5:30

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Vivek Agnihotri s strange reaction while Karan Johar was receiving the National Award also cropped from the photo | करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना विवेक अग्निहोत्रींचे विचित्र हावभाव, फोटोतूनही केलं क्रॉप

करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना विवेक अग्निहोत्रींचे विचित्र हावभाव, फोटोतूनही केलं क्रॉप

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पुरस्कार सोहळ्यातील अनेक क्षणचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान करण जोहर (Karan Johar) पुरस्कार स्वीकारत असताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर विवेक अग्निहोत्रींनी पोस्ट केलेल्या फोटोतून त्यांनी करण जोहरला क्रॉप केल्याचं दिसतंय.

'शेरशाह' सिनेमासाठी निर्माता करण जोहरला काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी करण व्यासपीठावर येताच विवेक अग्निहोत्रींकडे कॅमेरा फिरवला असता त्यांचे हावभाव फारच विचित्र होते. त्यांचा हा व्हिडिओ काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

यानंतर विवेक अग्निहोत्रींनी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले. यामध्ये सर्व विजेत्यांचा एकत्रित फोटो होता. मात्र त्यातूनही विवेक अग्निहोत्रींनी करण जोहरला क्रॉप केल्याचं नेटकऱ्यांनी नोटीस केलं.

विवेक अग्निहोत्रींनी याआधी करण जोहरवर अनेकदा टीका केली आहे. बॉलिवूड माफिया म्हणूनही त्याचा उल्लेख केला आहे. दोघांमधील कोल्ड वॉर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळालं.

Web Title: Vivek Agnihotri s strange reaction while Karan Johar was receiving the National Award also cropped from the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.