आई घरे साफ करायची, बाबा नारळ विकायचे… आणि मुलगा थेट कान्स २०२५ ला पोहोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:47 IST2025-06-04T10:46:51+5:302025-06-04T10:47:04+5:30

कान्स २०२५ गाठणाऱ्या अभिनेता विशाल जेठवाचा संघर्षमय प्रवास!

Vishal Jethwa Attending Cannes 2025 Reveals His Mother Used To Sweep And Mop People's Houses | आई घरे साफ करायची, बाबा नारळ विकायचे… आणि मुलगा थेट कान्स २०२५ ला पोहोचला!

आई घरे साफ करायची, बाबा नारळ विकायचे… आणि मुलगा थेट कान्स २०२५ ला पोहोचला!

Vishal Jethwa: 'कान्स' हा जगातील सर्वात मोठ्या आणि आदरणीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा महोत्सव ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि उत्तम सिनेमाचे प्रतीक आहे. सिनेविश्वात मानाचा मानल्या जाणाऱ्या या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी संधी काहींनाच मिळते.  अभिनेता विशाल जेठवा याच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.  २०२५ च्या कान्स महोत्सवामध्ये त्याच्या 'होमबाउंड' चित्रपट प्रदर्शित झाला. यानिमित्तानं तो कान्समध्ये पोहचला होता. हा क्षण त्याच्यासाठी अत्यंत अभिमानाचा ठरला.  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशालने कान्समधील अनुभव आणि त्याचा संघर्षमय प्रवास उलगडला आहे. 

विशालने एका मुलाखतीत आपला संघर्ष उलगडताना सांगितलं की, "मी गरीब कुटुंबातून आलो आहे. माझी आई कामवाली बाई होती. ती लोकांच्या घरी झाडू-पोछा करायची. कधी सुपरमार्केटमध्ये सॅनेटरी पॅड्स विकायची. माझे वडील नारळ पाणी विकायचे. मी लहानपणापासून हे सर्व पाहिलं आहे".

विशालने पुढे सांगितले की, कान्सचा भाग बनल्याने तो आनंदी होता, पण त्याच वेळी काहीसा घाबरला देखील होता. त्याला त्याच्या इंग्रजीवर फारसा आत्मविश्वास नव्हता, त्यामुळे तो थोडा नर्वस झाला होता. तो म्हणाला,  "माझ्या बहिणीने मला सांगितलं, "घाबरू नकोस, तू जसा आहेस तसाच सुंदर आहेस".

'होमबाउंड' सिनेमाविषयी...

विशाल जेठवाचा 'होमबाउंड' हा चित्रपट नीरज घायवन यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या निर्मितीत करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्वा मेहता आणि सोनम मिश्रा यांचा सहभाग आहे. या चित्रपटात विशालसोबत ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. कान्स २०२५ मध्ये या चित्रपटाची स्क्रीनिंग झाली असून प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांनी कौतुक केलं. मात्र, भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

यंदाचा कान्स चित्रपट महोत्सव १३ मे पासून २४ मे २०२५ पर्यंत सुरू होता.  यंदाच्या महोत्सवात, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, शर्मिला टागोर, करण जोहर आणि ईशान खट्टर यांसारख्या सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळाला. 

Web Title: Vishal Jethwa Attending Cannes 2025 Reveals His Mother Used To Sweep And Mop People's Houses