क्रिकेट मॅचपूर्वी तणाव दूर करण्यासाठी विराट कोहली पाहतो 'हा' सिनेमा; प्रियदर्शन यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:36 IST2026-03-14T13:31:54+5:302026-03-14T13:36:09+5:30

सामन्यापूर्वीचा ताण दूर करण्यासाठी विराट काय करतो, याचा खुलासा चक्क 'हेराफेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे.

virat kohli watch dhol movie by priyadarshan before cricket match | क्रिकेट मॅचपूर्वी तणाव दूर करण्यासाठी विराट कोहली पाहतो 'हा' सिनेमा; प्रियदर्शन यांनी केला खुलासा

क्रिकेट मॅचपूर्वी तणाव दूर करण्यासाठी विराट कोहली पाहतो 'हा' सिनेमा; प्रियदर्शन यांनी केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. मात्र, सामन्यापूर्वीचा ताण दूर करण्यासाठी विराट काय करतो, याचा खुलासा चक्क 'हेराफेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे. एक गाजलेला कॉमेडी चित्रपट विराटला सामन्यापूर्वी रिलॅक्स होण्यासाठी मदत करतो. कोणता आहे हा चित्रपट? जाणून घ्या

विराटचा आवडता चित्रपट

प्रियदर्शन यांनी पिंकविलाला दिलेल्या  एका मुलाखतीत सांगितले की, ''जेव्हा त्याला खूप तणाव जाणवतो किंवा सामन्यापूर्वी मन शांत करायचे असते, तेव्हा तो २००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'ढोल' हा चित्रपट पाहतो.'' राजपाल यादव, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा इतका चालला नव्हता पण विराटसाठी हा चित्रपट स्ट्रेसबस्टर असल्याचं प्रियदर्शन यांनी नमूद केलं.

प्रियदर्शन यांनी म्हटले आहे की, "जेव्हा मी पाहतो की विराट कोहली आणि इतर लोक सांगतात की ते त्यांच्या क्रिकेट सामन्यांपूर्वी तणावमुक्त होण्यासाठी 'ढोल' हा चित्रपट पाहतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. इतकेच नाही तर ते या चित्रपटातील संवाद देखील वारंवार बोलून दाखवतात."

तसे पाहायला गेले तर विराट कोहलीने याबद्दल जाहीरपणे काहीही म्हटलेले नाही, परंतु या दोघांनी एकत्र काम केले आहे. खरं तर, प्रियदर्शन यांनी आयपीएल (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी एका जाहिरातीचे दिग्दर्शन केले होते. त्यामध्ये विराट कोहली, शेन वॉटसन आणि ख्रिस गेल झळकले होते. त्या काळात प्रियदर्शन यांना विराट कोहलीचा अभिनय खूप आवडला होता.

Web Title : विराट कोहली मैच से पहले तनाव दूर करने के लिए 'ढोल' देखते हैं: प्रियदर्शन का खुलासा

Web Summary : निर्देशक प्रियदर्शन ने खुलासा किया कि विराट कोहली क्रिकेट मैचों से पहले तनाव दूर करने के लिए कॉमेडी फिल्म 'ढोल' देखते हैं। उन्हें यह तनाव दूर करने वाला लगता है।

Web Title : Virat Kohli watches 'Dhol' to relieve pre-match stress: Priyadarshan reveals.

Web Summary : Virat Kohli watches the comedy movie 'Dhol' to relieve stress before cricket matches, revealed director Priyadarshan. He finds it a stressbuster.