Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 10:46 IST2024-10-21T10:45:17+5:302024-10-21T10:46:17+5:30

न्यूझिलंडविरुद्ध सामना हरल्यानंतर विराट बंगळुरुवरुन मुंबईत आला. 'विरुष्का' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Virat Kohli attends Krishna Das keertan in mumbai with Anushka sharma | Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन

Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन

भारत विरुद्ध न्यूझिलंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. बंगळुरुच्या चिन्नास्वामीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाचव्या दिवशी भारताचा आठ विकेट्सने पराभव झाला. सामन्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) त्वरित मुंबईला रवाना झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी तो पत्नी अनुष्कासोबत (Anushka Sharma) कृष्ण दास यांच्या कीर्तनात सहभागी झाला.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कृष्ण दास यांच्या कीर्तनाचे चाहते आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. लंडनमध्ये असताना अनेकदा ते कृष्ण दास कीर्तनात दंग झाल्याचे व्हिडिओ समोर आले होते. तर काल कृष्ण दास यांच्या कीर्तनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी विराट कोहली आणि अनुष्का दोघांनी हजेरी लावली. दोघंही टाळ्या वाजवत कीर्तनात दंग झालेले दिसले. सकाळी मॅच हरल्यानंतर विराट संध्याकाळी कीर्तनात सहभागी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 'जस्ट कोहली थिंग्स' असं मजेशीर कॅप्शनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पहिला कसोटी सामना संपल्यानंतर आात दुसरा सुरु होणार आहे. यासाठी विराट आज नाहीतर उद्यापर्यंत पुन्हा बंगळुरुला रवाना होणार आहे. तर अनुष्का शर्मा सध्या मुंबईतच आहे. मात्र तरी ती सिनेमांपासून दूर असल्याने चाहते तिच्या कमबॅकची प्रतिक्षा करत आहेत. सध्या ती वामिका आणि अकाय दोन्ही मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे. 

Web Title: Virat Kohli attends Krishna Das keertan in mumbai with Anushka sharma