Video: विराट-अनुष्काचं अलिबागमधील ३२ कोटीचं हॉलिडे होम तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:02 IST2025-01-17T14:01:57+5:302025-01-17T14:02:32+5:30

अनुष्का आणि विराटच्या नव्या घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Virat Kohli Anushka Sharm Inr 32 Crore New Holiday Home In Alibaug | Video: विराट-अनुष्काचं अलिबागमधील ३२ कोटीचं हॉलिडे होम तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरु

Video: विराट-अनुष्काचं अलिबागमधील ३२ कोटीचं हॉलिडे होम तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरु

Virat Kohli-Anushka Sharm Alibaug Villa: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या भारतात आहे. काही दिवसांपासून दोघेही मुंबई ते अलिबाग असा प्रवास करताना पाहायला मिळालेत. अलिबागमध्ये या जोडप्याचं हॉलिडे होम तयार झालं आहे.  लवकरच विराट आणि अनुष्का आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश (Housewarming Ceremony) पुजा करणार असल्याची माहिती आहे.

अनुष्का आणि विराटचे व्हायरल झालेले व्हिडीओ बघितल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  या नव्या व्हायरल व्हिडीओमध्ये अलिबागमधील त्यांच्या बंगला पाहायला मिळतो. या बंगल्याला आता गृहप्रवेशाच्या आधी फुलांनी चांगलेच सजवले असल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट यांच्या अलिबागमधील बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वार दिसतेय.  ते फुलांनी सजवले गेले असून, गृहप्रवेशाच्या सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळतेय.

विराट आणि अनुष्कानं आलिबागमध्ये २०२२ साली १९ कोटींमध्ये ही जागा खरेदी केली होती.  तर बांधकामात १३ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांचं हे  हॉलिडे होम जवळपास ८ एकर प्लॉटवर बांधण्यात आलेलं आहे.  या घरात ४०० चौरस फुटांचा स्विमिंग पूल देखील आहे. हे घर अत्याधुनिक सुविधांनी परिपुर्ण असून एखाद्या महालापेक्षा कमी नाही. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली २०१७ मध्ये इटलीत विवाहबद्ध झाले होते. आता हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत. त्यांनी मुलीचे नाव वामिका आणि मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. या जोडप्याने अद्याप मुलांचे चेहरे दाखवलेले नाहीत.
 

Web Title: Virat Kohli Anushka Sharm Inr 32 Crore New Holiday Home In Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.