Madhuri Dixit Troll : 'हे काय केलं तु'; बॉलिवुडची डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित 'एका' डान्समुळेच झाली ट्रोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 12:46 IST2022-12-04T12:38:39+5:302022-12-04T12:46:18+5:30
डान्स क्वीन माधुरीनेच एका पाकिस्तानी मुलीला कॉपी केलं आहे आणि यामुळे माधुरी चांगलीच ट्रोल होतीये.

Madhuri Dixit Troll : 'हे काय केलं तु'; बॉलिवुडची डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित 'एका' डान्समुळेच झाली ट्रोल!
Madhuri Dixit Troll : बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित चा डान्स बघणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. तिच्या अदा, तिची स्माईल, चेहऱ्यावरील हावभाव यावर चाहते फिदा आहेत. माधुरी सारखा डान्स करता आला पाहिजे अशी अनेक मुलींची इच्छा असते. मात्र माधुरीनेच कोणाला (Copy) कॉपी केलं असेल तर ? यावर विश्वास बसत नाही ना. पण डान्स क्वीन माधुरीनेच एका पाकिस्तानी मुलीला कॉपी केलं आहे आणि यामुळे माधुरी चांगलीच ट्रोल होतीये.
'मेरा दिल ये पुकारे आजा' हे गाणं सध्या पुन्हा गाजतंय. याचं कारणंही असंच आहे. आयेशा नावाच्या पाकिस्तानी मुलीने एका लग्नात या गाण्यावर सुंदर डान्स केला. तिचा डान्स काही वेळातच तुफान व्हायरल झाला. मग काय भारतातुनही तिच्यावर कमेंट्स चा पाऊस सुरु झाला. तिचा डान्स सगळ्यांनाच खुप आवडला. मुलींनाही वाटायला लागलं आपणही एखाद्या लग्नात असाच डान्स करावा. पण या डान्सची भुरळ माधुरी दीक्षितवरही एवढी दिसली की चक्क माधुरीने सुद्धा हा डान्स कॉपी केला. यावर चाहते मात्र नाराज झाले.
आणि माधुरी दीक्षित झाली ट्रोल
माधुरी चा डान्स बघुन चाहते म्हणतात, 'बापरे, तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती.' तर एक जण म्हणला, 'तुम्ही माझ्या फेवरेट आहात, असला थर्ड क्लास डान्स ट्रेंड फॉलो करु नका.' हा व्हायरस भारतातही पोहोचला का अशीही कमेंट एकाने केली आहे. तर 'पाकिस्तानी मुलीनेच तुमच्यापेक्षा छान केलाय' असेही नेटकरी म्हणले आहेत.
डान्ससाठी माधुरी दीक्षित इतकी प्रसिद्ध आहे मात्र आता डान्सवरुनच ती ट्रोलिंगचंही कारण बनली आहे. सध्या माधुरी (Jhalak Dikh La Ja) 'झलक दिख ला जा' या शो मध्ये जज आहे. तिचे अनेक डान्स व्हिडिओ, (Reels) रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.