Monalisa : "सनोज मिश्रा मोनालिसाला मुलगी मानतात, कोणीतरी तिला हे... "; आई-वडिलांनीच फेटाळले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:04 IST2026-03-26T11:02:12+5:302026-03-26T11:04:39+5:30
Monalisa And Sanoj Mishra : महाकुंभ २०२५ मुळे प्रसिद्धीझोतात आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा सध्या गंभीर वादात सापडली आहे.

Monalisa : "सनोज मिश्रा मोनालिसाला मुलगी मानतात, कोणीतरी तिला हे... "; आई-वडिलांनीच फेटाळले आरोप
महाकुंभ २०२५ मुळे प्रसिद्धीझोतात आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा सध्या गंभीर वादात सापडली आहे. मुस्लिम तरुण फरमान खानसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत असलेल्या मोनालिसाने आता आपल्याच कुटुंबावर आणि चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र तिचे आई-वडील आता तिच्या विरोधात उभे ठाकले असून त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मंगळवारी मोनालिसाने चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता, तसेच कुटुंबाने आपल्याला मदत केली नसल्याचं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना मोनालिसाच्या आईने 'एनडीटीव्ही'शी बोलताना सांगितलं की, "मोनालिसा स्वतःचा वाचवण्यासाठी अशी विधानं करत आहे. कोणीतरी तिला हे सर्व शिकवत आहे. तिने दिग्दर्शकावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत."
"मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत नीच माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप
मोनालिसाचे वडील जयसिंह यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, "दिग्दर्शक सनोज मिश्रा हे मोनालिसाला आपल्या मुलीप्रमाणे मानतात. तिचे आरोप बिनबुडाचे आहेत." सनोज मिश्रा यांनी तिचे फरमान खानसोबतचे लग्न म्हणजे 'लव्ह जिहाद' असल्याचं म्हटलं होतं. यानंतरच मोनालिसाने त्यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले. मिश्रा यांनी एक व्हिडीओ जारी करून आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे.
"मी काहीतरी खाऊन मरून जाईन"; मोनालिसाच्या आईचा टाहो, हात जोडून केली 'ही' विनंती
"मोनालिसा अल्पवयीन, २००९ मध्ये जन्म, मुद्दाम वाढवलं वय..."; काकांचा खळबळजनक खुलासा
धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे काही लोक आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.सनोज मिश्रा यांनी दावा केला की, त्यांनी मोनालिसाला महाकुंभच्या मेळ्यातून शोधून माया नगरीत आणलं आणि अभिनेत्री बनवलं. तिच्या चित्रपटावर आतापर्यंत १० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, तिने कोणालाही न सांगता दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि व्यवसायावर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.