विनय पाठक व राजपाल यादव आले एकत्र, 'मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 17:34 IST2019-11-08T17:33:52+5:302019-11-08T17:34:15+5:30
'मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे

विनय पाठक व राजपाल यादव आले एकत्र, 'मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट' चित्रपटात
विनय पाठक,राजपाल यादव आणि संजय मिश्रा अभिनित मिस्टर ब्लॅक मिस्टर व्हाईट या चित्रपटाला अखेर प्रदर्शनासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यु/अ प्रमाणपत्र मिळाले आहे आणि आज प्रदर्शित होत आहे.
आपल्यासाठी अनेकांना रोजच्या ताणतणावापासून मुक्ती आणि आनंद मिळवण्याचे माध्यम असतात ते चित्रपट आणि त्यातही कुठल्याही मूडला साजेसा ठरतो तो विनोदी चित्रपट. उत्तम कथानक, खिळवून ठेवणारी मनोरंजन करणारी वेगळी कल्पना प्रेक्षकांना आवडू लागली असून त्यासाठी प्रेक्षक आवर्जून चित्रपटगृहांकडे वळू लागले आहेत. त्यामुळेच हा निख्खळ विनोदी चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.
या चित्रपटात विनय पाठक,राजपाल यादव,संजय मिश्रा सोबत मनोज जोशी,विजय राज,हेमंत पांडे,मुरली शर्मा,सुरेश मेनन आणि रेशम टिपणीस आदी मातब्बर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.संतोष एस लाड यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून सूबेदार टीएम् सूर्यवंशी यांच्या मल्टी चॉइस प्रॉडक्शनने तो सादर केला आहे..या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एनएस राज भरत यांनी केले आहे.
विनोदी अभिनयातले कसलेले कलाकार म्हणून ओळखले जाणारे हे सगळे अभिनेते एकाच चित्रपटात एकत्र आल्याने हा चित्रपट धमाल विनोदी ठरला असून प्रेक्षकांच्या तो निश्चित पसंतीस येईल असा निर्मात्यांना विश्वास आहे.