मुंबईत पोहोचताच विकी कौशलला भेटली प्रिया प्रकाश वारियर; बॉलिवूड डेब्यूची तयारी की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 15:27 IST2019-01-13T15:25:59+5:302019-01-13T15:27:09+5:30
आपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘खल्लास गर्ल’ सध्या मुंबईत आहेत. मुंबईत आल्या आल्या प्रिया प्रकाशने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची भेट घेतली.

मुंबईत पोहोचताच विकी कौशलला भेटली प्रिया प्रकाश वारियर; बॉलिवूड डेब्यूची तयारी की आणखी काही?
गतवर्षीची इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. तिची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते. ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली. आपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘खल्लास गर्ल’ सध्या मुंबईत आहेत. मुंबईत आल्या आल्या प्रिया प्रकाशने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची भेट घेतली. केवळ इतकेच नाही तर प्रियाने विकीसोबतचा स्वत:चा ‘आयकॉनिक सीन’ही केला. याचा व्हिडिओ प्रिया प्रकाशने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करायची देर की, प्रिया प्रकाशच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु झाली.
प्रियाने केवळ विकीलाच नाही तर ‘सिम्बा’ रणवीर सिंग यालाही भेटली. तुम्हाला ठाऊक असेलचं की, ‘सिम्बा’साठी आधी प्रिया प्रकाशचे नाव चर्चेत होते. पण ऐनवेळी या चित्रपटात सारा अली खानची वर्णी लागली. एकंदर काय तर प्रिया प्रकाशचा एक चान्स हुकला. पण आता पुन्हा एकदा तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा रंगली आहे. विकीसोबतचा तिचा व्हिडिओ बघता, लवकरच ही जोडी नव्या चित्रपटात दिसू शकते, असे मानले जात आहे.
प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत दिसली होती.