"ऐसे बात नही कर सकते" पापाराझींनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नावर विजय वर्मा भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 09:11 IST2023-09-01T09:09:05+5:302023-09-01T09:11:23+5:30

पापाराझींनी विजयला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे विजय अक्षरश: भडकला. 

vijay varma return from maldives trip with tamannah bhatia actor got angry with paparazi when he asked insulting question to him | "ऐसे बात नही कर सकते" पापाराझींनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नावर विजय वर्मा भडकला

"ऐसे बात नही कर सकते" पापाराझींनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नावर विजय वर्मा भडकला

बॉलिवूड असो किंवा ओटीटी सध्या सगळीकडेच आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारा अभिनेता विजय वर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. विजय वर्मा (Vijay Varma) आणि तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघेही सोबत दिसले आहेत. नुकतंच हे कपल मालदीव्ह्जवरुन परतले आहे. विमानतळावर दोघंही वेगवेगळे बाहेर पडले. तेव्हा पापाराझींनी विजयला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे विजय अक्षरश: भडकला. 

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्या रिलेशनशिपमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आधी ही सगळी अफवा वाटली. दोघांनी'लस्टस्टोरीज 2' मध्ये एकत्र काम केले. यामध्ये त्यांनी इंटिमेट सीन्सही दिले. याचदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. हे प्रमोशनल स्टंट असल्याचं वाटत होतं मात्र नंतर तमन्नाने दिलेल्या मुलाखतीमुळे स्पष्ट झालं. नुकतंच हे कपल मालदीव्ह्जमध्ये सुट्ट्या एन्जॉय करुन परतलं आहे. मुंबई विमानतळावर बाहेर विजय वर्मा चाहत्यांसोबत सेल्फी काढत होता.  तेव्हा पापाराझींनी त्याला विचारलं,'कशी झाली ट्रिप? मालदीव्ह्जच्या समुद्राची मजा घेऊन आलात?'

पापाराझींचा हा प्रश्न विजयला अजिबात पटला नाही. 'तुम्ही असं बोलू शकत नाही' असं म्हणत त्याने पापाराझीला झापलं. पापाराझींनी केलेली ही कमेंट विजयला नक्कीच आवडली नाही. त्यांच्या नात्याबद्दल बोलायचं तर विजयला कधीच रिलेशनशिपमध्ये यायचं नव्हतं. मात्र तमन्नाला भेटून त्याचं मन बदललं. तमन्नाने आपली १८ वर्षांची नो किसींग पॉलिसी मोडली. 'लस्ट स्टोरीज 2' सिनेमात दोघांनी इंटिमेट सीन दिले त्याची फारच चर्चा झाली. 

Web Title: vijay varma return from maldives trip with tamannah bhatia actor got angry with paparazi when he asked insulting question to him